IISC Recruitment 2022: भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांसाठी भरती! लगेच करा अर्ज
IISC Recruitment 2022: या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार iisc.ac.in वर भेट देऊ शकतात.

IISC Recruitment 2022: भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण 100 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार भारतीय विज्ञान संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. या पदासांठी अर्ज प्रक्रिया सुरु झालीय. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार iisc.ac.in वर भेट देऊ शकतात.
भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांसाठी 7 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. तर, 28 फेब्रुवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. यामुळं इच्छुक उमेदवारांनी वेळेतच अर्ज करावं.
भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक 100 पदांसाठी जागा-
ओबीसी- 25 जागा
एससी- 16 जागा
एसटी- 7 जागा
ईडब्ल्यूएस-10 जागा
शैक्षणिक पात्रता-
भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किमान 55% गुणांसह उतीर्ण झालेला असावा. तसेच त्याच्याकडं B.Tech/BE/B.Arch/B.Sc / BCA / BVSc पदवी असावी.
वय-
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 26 पेक्षा कमी असावं. तथापि, सरकारी नियमांनुसार एस/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट असेल. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार आयआयएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकतात.
निवड प्रक्रिया
लेखी चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज शुल्क
ओबीसी आणि ईडब्लूएस प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भकावं लागणार आहे. तर, एसी, एसटी, पीडब्ल्यूडी, महिला, ट्रांसजेंडर, माजी सैनिक श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कापासू सूट देण्यात आलीय.
वेतन
या पदांवरील निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेवल 3 अंतर्गत 21700 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
हे देखील वाचा-
- दरमाह 1.60 लाखांपर्यंतचं मिळेल वेतन; सरकारी नोकरीची नामी संधी, कुठे कराल अर्ज?
- Job Majha: बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँकेमध्ये भरती सुरू, असा करा अर्ज
- Bank Job 2022 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये SO पदांसाठी मेगा भरती; पदवीधर अर्ज करू शकतात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























