एक्स्प्लोर

दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! राज्यात होमगार्डसाठी भरती सुरू, प्रतिदिन 670 रुपये भत्ता

दहावी पास असाल आणि सरकारी नोकरी शोधत असाल तर होमगार्ड पदासाठी तुमच्या जिल्ह्यासाठी अर्ज करता येऊ शकतो. पुरुषांसह महिलांनाही अर्ज करता येणार असून १४ ऑगस्टपर्यंत ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Homeguard Bharti 2024: तुम्ही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला आता होमगार्ड पदासाठी नोकरीची संधी आहे. राज्यात सध्या जिल्हानिहाय होमगार्ड भरती सुरु झाली असून पोलीस विभागाच्या सहकार्याने राज्यात होमगार्डसाठी नोंदणी सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख १४ ते १६ ऑगस्टपर्यं आहे. जिल्हानिहाय अर्ज भरण्याची शेवटची तारीख वेगळी आहे. होमगार्ड म्हणून नियुक्त झाल्यानंतर प्रतिदिन ८९५ रुपये भत्ता राज्यसरकारकडून दिला जातो.

होमगार्डचे काम काय?

देशात होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जाते. होमगार्ड ही नोकरी किंवा रोजगार नसून  आपत्कालिन स्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाच्या मागणीनुसार त्यांना बंदोबस्तासाठी बोलवले जाते. अग्निशमन, विमोचन, महामारीकाळात, संपकाळात प्रशासनाच्या मदतीसाठी होमगार्डची नियुक्ती करण्यात येते. 

पात्रता काय?

होमगार्डसाठी अर्ज करणार असाल तर शैक्षणिक पात्रता कमीत कमी १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
 शारिरिक पात्रता- वय २० वर्षे पूर्ण ते ५० वर्षांच्या आत असणे आवश्यक
उंची- पुरुषांकरता १६२ सेमी महिलांकरता १५० सेमी
छाती- (फक्त पुरुष उमेदवारांकरता)- न फुगविता किमान ७६ सेमी

आवश्यक कागदपत्रे

होमगार्डसाठी अर्ज करताना लागणारी रहीवासी पुरावा, शैक्षणिक आहर्ता प्रमाणपत्र, जन्मदिनांक पुराव्याकरता १० बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक अहर्ता धारण करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र, खासगी नोकरी करत असल्यास ना हरकत प्रमाणपत्र, ३ महिन्यांच्या आतील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे.

किती मिळतो प्रतिदिन भत्ता?

होमगार्ड म्हणून नियूक्ती झालेल्या उमेदवाराला बंदोबस्तात असताना प्रतिदिन ८९५ रुपये भत्ता देण्यात येतो. यामध्ये बंदोबस्त काळात ५७० रुपये कर्तव्य भत्ता, १०० रुपये उपहार भत्ता दिला जातो. तसेच  प्रशिक्षणकाळात ३५ रु खिसाभत्ता व १०० रुपये भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी  ९० रुपये भत्ता दिला जातो.

कुठे कराल अर्ज?

होमगार्डसाठी राज्यात जिल्हानिहाय नोंदणी २५ जुलैपासून सुरु झाली असून १४ ऑगस्ट या कालावधीपर्यंत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर सुरु राहणार आहे. जिल्हानिहाय तुमच्या पात्रतेच्या आणि परिक्षेच्या अटी या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो त्याच पोलीस ठाणे अंतर्गत आणि पक्षकामध्ये अर्ज दाखल करता येतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवातABP Majha Headlines :  6:30 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget