(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Railway Recruitment 2022 : रेल्वेत मेगा भरती, 2 हजारांहून अधिक रिक्त पदं, 10वी पास उमेदवारांना करता येणार अर्ज
Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेने बंपर भरती सुरु होणार आहे. पूर्व रेल्वेने विविध ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसंदर्भात नवीन अधिसूचना जारी केली आहे.
Railway Recruitment 2022 : रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी आहे. भारतीय रेल्वेत बंपर भरती करण्यात येणार आहे. पूर्व रेल्वेने विविध ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसंदर्भात नवीन अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 11 एप्रिल 2022 पासून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2022 आहे. भारतीय रेल्वेद्वारे शिकाऊ पदासाठी भरती निवड प्रक्रियेच्या आधारावर केली जाईल.
अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेद्वारे हावडा विभाग, लिलुआह वर्कशॉप, सियालदह विभाग, मालदा विभाग, जमालपूर वर्कशॉप, आसनसोल विभाग, कांचरापारा कार्यशाळेत फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, सुतार, पेंटर, टर्नर, इलेक्ट्रीशियन आणि वायरमन यासह एकूण 2972 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट rrcer.com ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 11 एप्रिल 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2022
पात्रता
शिकाऊ उमेदवाराच्या या पदांसाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराकडे नॅशनल काउंन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगने जारी केलेल्या संबंधित राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
अर्जाची फी
पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट rrcer.com वर जाऊन 11 एप्रिल ते 10 मे 2022 या काळात ऑनलाइन अर्ज करता येईल. ओपन आणि ओबीसी उमेदवारांकडून 100 रुपये अर्जाचे शुल्क आकारले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या :
- Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा उसळले; दिल्लीत पेट्रोल, तर मुंबईत डिझेल 103 पार
- पत्नीची समजूत घालायला सासरी गेला, पण नाराज पत्नीसह सासरच्यांनी धूधू धुतला; नवऱ्याचा मृत्यू
- श्रीलंकेत पंतप्रधानांच्या मुलासह 26 मंत्र्यांचा राजीनामा, राजपक्षे पंतप्रधान पदी कायम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha