पत्नीची समजूत घालायला सासरी गेला, पण नाराज पत्नीसह सासरच्यांनी धूधू धुतला; नवऱ्याचा मृत्यू
झारखंड : नाराज पत्नीची समजूत काढण्यासाठी गेलेल्या जावयाला पत्नीसह सासरच्या मंडळीनी जीवे मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती वादामुळे माहेरी गेलेल्या नाराज पत्नीची समजूत काढण्यासाठी गेलेल्या पतीची पत्नीसह सासरच्या मंडळीनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत इसमाचा मृत्यू झाला आहे.
झारखंड : नाराज पत्नीची समजूत काढण्यासाठी गेलेल्या जावयाला पत्नीसह सासरच्या मंडळीनी जीवे मारल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती वादामुळे माहेरी गेलेल्या नाराज पत्नीची समजूत काढण्यासाठी गेलेल्या पतीची पत्नीसह सासरच्या मंडळीनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत इसमाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना चतरा जिल्ह्यातील गंभीर नक्षलग्रस्त कुंडा पोलीस स्टेशन क्षेत्रातील सोहरलाट गावातील आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सदर रुग्णालयात पाठवला.
मृत तरुणाच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुटकुईया गावात राहणारा 35 वर्षीय खेहाली गंझू हा दोन दिवसांपूर्वी त्याच्या सासरीच्या सोहरलाट गावी गेला होता. तिथे त्याचा त्याचा पत्नीसोबत पूर्वीच्या वादावरून पुन्हा वाद झाला. त्यानंतर भांडणाच्या रागातून पत्नीसह सासरच्यांनी मिळून खेहाली याला लाठ्याकाठ्याने मारहाण केली. खेहालीच्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. याबाबत गावात अनेकदा पंचायतीही झाल्या. ज्यामध्ये पत्नीनेही आपली चूक मान्य केली होती.
या प्रकरणी मृताच्या नातेवाइकांच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी मृताची पत्नी रामिया देवी, सासरे उदय गांझू, फजेती गांझू, बाळो यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, सर्व आरोपी घर सोडून पळून गेले असून आरोपींचा शोध सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- भारतात तयार होणार टीबीची लस? सहा राज्यांमध्ये 12 हजार स्वयंसेवकांवर चाचणी सुरू
- श्रीलंकेत पंतप्रधानांच्या मुलासह 26 मंत्र्यांचा राजीनामा, राजपक्षे पंतप्रधान पदी कायम
- आणीबाणी जाहीर केल्यानंतर श्रीलंकेत निदर्शने, कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी 600 पेक्षा जास्त जणांना अटक
- Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा उसळले; दिल्लीत पेट्रोल, तर मुंबईत डिझेल 103 पार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha