एक्स्प्लोर

ग्रॅज्युएशनंतर सरकारी नोकरीच्या शोधात आहात? 'ही' संधी सोडू नका; करन्सी नोट प्रेसमध्ये मोठी भरती!

Jobs 2023: पदवी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी, करन्सी नोट प्रेस नाशिकमध्ये 117 पदांसाठी रिक्त जागा, सविस्तर तपशील जाणून घ्या...

Currency Note Press Nashik Jobs 2023: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी. करन्सी नोट प्रेस (Currency Note Press) नाशिकमध्ये (Nashik) अनेक पदांसाठी भरती जारी करण्यात आली आहे. यामार्फत 117 पदांवर भरती केली जाईल. करन्सी नोट प्रेस नाशिकनं जारी केलेल्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर आहे. जर तुम्ही या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल, तर नोट प्रेसची अधिकृत वेबसाईट cnpnashik.spmcil.com जाऊन अर्ज करु शकता. 

भरतीसंदर्भात महत्त्वाची माहिती 

19 ऑक्टोबर रोजी भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तुम्हाला या भरती प्रक्रियेअंतर्गत जारी करण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज 18 नोव्हेंबरपूर्वी करावा लागेल, असं नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेला कोणताही अर्ज उशिरा दंड भरल्यानंतरही स्वीकारला जाणार नाही, असंही अधिसूचनेत स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे. 

किती पदांची भरती? 

करन्सी नोट प्रेस नाशिक भरती प्रक्रियेअंतर्गत 117 पदांवर भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला cnpnashik.spmcil.com वर जावं लागेल. या भरतीद्वारे पर्यवेक्षकाच्या 3 पदं, कलाकार 1 पदं, सचिवालय सहाय्यक 1 पदं आणि कनिष्ठ तंत्रज्ञ 112 पदांवर भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

पदवी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. तर PG, BE, B.Tech पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा 

करन्सी नोट प्रेस नाशिक भरती प्रक्रियेसाठी 28 ते 30 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात. 

वेतन 

जर तुमची निवड पर्यवेक्षक पदासाठी झाल्यास तुम्हाला दरमहा 27,600-95,910 रुपयांपर्यंत वेतन मिळू शकतं. कलाकाराला 23,910-85,570 रुपये, सचिवालय असिस्टंटला 23,910-85,570 रुपये आणि कनिष्ठ तंत्रज्ञ पदाला 18,780-67,390 रुपये मिळतील.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी फी किती? 

अनारक्षित, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 600 रुपये आकारले जातील.
SC/ST/PWD अर्जदारांना कोणतेही परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.
SC/ST/PWD अर्जदारांना अर्ज फी म्हणून फक्त 200 रुपये भरावे लागतील.
एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.

कशी होणार निवड प्रक्रिया? 

करन्सी नोट प्रेस नाशिक भरती प्रक्रियेसाठी सर्वात आधी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. परीक्षा पास होणाऱ्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल. 

भरती प्रक्रियेसंदर्भात काही महत्त्वाच्या लिंक 

या लिंकवरून थेट अर्ज करा - https://ibpsonline.ibps.in/cnpoct23/
या लिंकवरून सूचना तपासा - https://cnpnashik.spmcil.com/wp-content/uploads/2023/10/FINAL-Advertisement-dated-18.10.2023-for-upload-1.pdf

महत्त्वाच्या इतर बातम्या :

UPSC Recruitment 2023 : सरकारी नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी? संपूर्ण माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Embed widget