Railway Recruitment 2022 : रेल्वेत नोकरी करण्याची शेवटची संधी, आजच अर्ज करा, 'ही' आहे प्रक्रिया
Railway Recruitment 2022 : मध्य रेल्वेने कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अधिकृत साइटला भेट देऊन उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
Railway Recruitment 2022 : सध्या अनेकजण चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
मध्य रेल्वेने कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी 20 रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. अधिकृत साइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी 18 ते 33 वर्षे वयोमर्यादा आहे. तर, OBC प्रवर्गासाठी 18 ते 36 वर्षे आणि SC/ST प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे वयाची अट आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराकडे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये चार वर्षांची पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील तीन वर्षांचा डिप्लोमा असावा. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.
पगार
निवड झालेल्या उमेदवाराला 25 हजार ते 30 हजार रुपये पगार दिला जाईल.
निवड प्रक्रिया
पात्रता, अनुभव आणि व्यक्तिमत्वाच्या आधारावर अर्जदारांची निवड केली जाईल.
अर्ज फी
SC/ST/OBC/महिला/अल्पसंख्याक/EWS उमेदवारांसाठी अर्ज फी रु. 250 आहे. इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी 500 रुपये आहे.
असा करा अर्ज
मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट cr.indianrailways.gov.in च्या होम पेजवर जा. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक भरतीचा पर्याय निवडा. अधिसूचनेमध्ये सविस्तर वाचा. त्यानंतर तेथे दिलेला अर्ज तपशीलवार वाचा आणि अर्ज भरा.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job Majha : इंडियन बँक, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे इथे नोकरीची संधी, वाचा डिटेल्स
- Job Majha : बँक ऑफ बडोदा, पुणे महापालिका, वसई सहकारी बँकेत भरती सुरू; असा करा अर्ज
- Job Majha : मध्य रेल्वे, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि IBM नागपूर येथे नोकरीची संधी, पाहा डिटेल्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha