(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'रात्रीस खेळ चाले' मालिका बंद, शेवंता गहिवरली, म्हणाली...
झी मराठीवरील प्रेक्षकांना आवडलेली रात्रीस खेळ चाले ही मालिका अखेर बंद झाली. मालिकेचा काल 29 ऑगस्टला शेवटचा भाग प्रसारित झाला. या मालिकेच्या दुसऱ्या भागात सर्वाधिक चर्चेत राहिली ती शेवंता. शेवंताची भूमिका करणारी अपूर्वा नेमळेकर ही मालिका संपल्यानंतर भावनिक झाली आहे. तिनं आपल्या भावना इन्स्टावर पोस्ट करत व्यक्त केल्या आहेत.
मुंबई : झी मराठीवरील प्रेक्षकांना आवडलेली रात्रीस खेळ चाले 2 ही मालिका अखेर बंद झाली. मालिकेचा काल 29 ऑगस्टला शेवटचा भाग प्रसारित झाला. या मालिकेच्या दुसऱ्या भागात सर्वाधिक चर्चेत राहिली ती शेवंता. शेवंताची भूमिका करणारी अपूर्वा नेमळेकर ही मालिका संपल्यानंतर भावनिक झाली आहे. तिनं आपल्या भावना इन्स्टावर पोस्ट करत व्यक्त केल्या आहेत.
इन्स्टावर एक फोटो शेअर करत अपूर्वानं लिहिलं आहे की, नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम मी आशा करते की आपण आपली आणि आपल्या जिवलगांची काळजी घेत आहात.. वेळ कठीण जरी असेल तरी आपण पुन्हा जोमाने उभे राहुया.. जसे की आपल्याला ठाऊक असेलच की आपली लाडकी मालिका म्हणजे रात्रीसखेळ चाले 2 ही आज आपला निरोप घेत आहे.. हे लक्षात येताच खूप आठवणी आज पुन्हा दाटून आल्या, असं शेवंता म्हणजे अपूर्वानं म्हटलं आहे.
ह्या मालिकेचा एक अविभाज्य भाग म्हणून मी झी मराठीचे मना पासून आभार मानते. त्याच बरोबर मी मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते ह्यांचे सुद्धा खूप आभार मानू इच्छिते. आणि आपण माय बाप प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्या बद्दल आपले मनापासून आभार. मालिका समाप्ती ला आली हे समजायला कठीण तर जात आहेतच पण त्याच बरोबरच खूप साऱ्या आठवणींना पूर्णविराम मिळणार आहे, असं अपूर्वानं म्हटलं आहे.
'देवमाणसा'च्या आगमनामुळे 'रात्रीस खेळ' होणार बंद!
पहिल्या भागाचे गुपित ह्या भागात उलगडणार आहे. म्हटल्यावर शेवंता ह्या भूमिकेचे महत्त्व हे वेगळ्या प्रकारची जबाबदारी स्वीकारून मी पुन्हा टीव्ही वर यायचे ठरवले. जबाबदारी म्हटली की दडपणाखाली असणे साहजिक होते. पण त्यातून आपली ओळख पुन्हा निर्माण करायची एक सुवर्ण संधी ह्यातून मला दिसली.. आणि त्याला दिलेला प्रतिसाद त्याची पावती देऊन गेला.. पुढे आपली भूमिका किती महत्वाच्या टप्प्यावर जात आहे हे कळताच माझ्या बरोबर सगळेच मेहनतीने काम करू लागले.. माझ्या बरोबरच इतर सगळ्यांचा ह्या मालिकेला लाभलेला सहभाग खूप मोठा होता, असं अपूर्वानं म्हटलं आहे.
अपूर्वानं म्हटलं आहे की, हा अनुभव खूप मोठी प्रेरणा देऊन गेला आहे आणि अजून काम करायची जिद्द देत राहतो. कुठलही काम जेव्हा शेवटच्या टप्प्यात येत तेव्हा आपल्याला त्या बद्दल आपुलकी आणि अभिमान वाटतो.. आज तसेच काही वाटत आहे. शेवंतांचे विविध रंगी पैलू साकारताना तिच्या व्यक्तीरेखा बद्दल फक्त आपण ऐकले होते,पण ही भूमिका रंगवताना त्या मध्ये माझ्या अभिनयाचे रंग चढतच गेले, आपल्या मालिकेतून आपलं मनोरंजन पुन्हा एकदा करण्याची संधी दिल्या बद्धल खूप आभार.. पुन्हा नव्याने आपल्या समोर मी लवकरच येईन ह्या बद्दल मी आशावादी आहे ! आपलं प्रेम आणि प्रतिसाद मिळत रहावा, ही विनंती. एक कलाकार म्हणून आयुष्यभर रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करेन , बस तुमची साथ कायम राहावी हीच विनंती. माझा पॅकअप झाल्या नंतर काढलेला हा आशीर्वाद स्वरूप फोटो आणि आज मस्तिष्का वर पडलेले ही पुष्प पाकळी यांने माझे मन गहिवरून गेले, असं अपूर्वानं म्हटलंय.
सिंधुगुर्गातल्या आकेरी इथे जवळपास वर्षभरापासून रात्रीस खेळ चाले ही मालिका सुरू होती. या मालिकेचा दुसरा सीझन लोकांना आवडला. त्यातलं शेवंता आणि आण्णा नाईकांचं कॉम्बिनेशन लोकांना खूप आवडलं. शिवाय, वच्छी, माधव, दत्ता, पांडू या व्यक्तिरेखाही घराघरात ओळखल्या जाऊ लागल्या. ही मालिका 29 ऑगस्टला संपली. त्या जागी 31 तारखेपासून देवमाणूस ही नवी मालिका येणार आहे.