एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

माजी खासदार बैजयंत पांडा यांच्या आरोपांनंतर बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमधील संबंधांची पुन्हा चर्चा

दहशतवादी कारवाया, देशद्वेष पसरवण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गुंतवलेल्या पैशांचा वापर करून पाकिस्तान दहशतवादी कट रचण्यासाठी भारतीय चित्रपट उद्योगात आपले नेटवर्क वाढवत आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते बैजयंत पांडा यांनी बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीजचा पाकिस्तानी सैन्यदल आणि 'आयएसआय'शी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. पांडा यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमधील संबंध चर्चेत आले आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तान आर्मी आणि गुप्तचर यंत्रणेचा मोहरा आहे. या मोहऱ्याच्या माध्यमातून पाकिस्तानने भारताविरुद्ध कट रचला. आता दहशतवादी कारवाया, देशद्वेष पसरवण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था आणि हिंदी चित्रपटसृष्टीत गुंतवलेल्या पैशांचा वापर करुन पाकिस्तान दहशतवादी कट रचण्यासाठी भारतीय चित्रपट उद्योगात आपले नेटवर्क वाढवत आहे. भाजप उपाध्यक्ष जय पांडा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतचे ट्वीट केले आहे. तसेच बॉलिवूडमधील व्यक्तींचे पाकिस्तान आणि आयएसआयशी संबंध असल्याचे काही पुरावे समोर आल्याचं देखील म्हटलं आहे. बैजयंत जय पांडा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की "बॉलिवूडमधील काही व्यक्तींचा काश्मीरमध्ये हिंसा पसरवणाऱ्या तसेच अनिवासी भारतीयांसोबत संबंध आहेत. हे संबंध दाखवणारी काही कागदपत्रं समोर आली आहेत. काश्मीरमध्ये हिंसा पसरवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तान आणि आयएसआयशी असलेले संबंध यामधून उघड होत आहेत."

पांडा यांनी नाव न घेता परदेशातल्या एका मोठ्या रिअल इस्टेट बिझनेसमनकडे इशारा केला आहे. ही व्यक्ती पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या अत्यंत जवळची आहे. आता याच व्यक्तीचे बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टारसोबत फोटो आणि व्हिडीओ आहेत तसेच याच व्यक्तीचे पाकिस्तानी लष्कराच्या मोठ्या अधिकारी आणि राजकरण्यांशी संबंध असल्याचीही माहिती आहे.

पांडा यांच्या आरोपांबरोबर अमेरिकेत बॉलिवूडचे इव्हेंट आयोजित करुन पाकिस्तानच्या आयएसआयला पैसे पुरवणाऱ्या रेहान सिद्दीकीवर अखेर बंदी घालण्यात आली आहे. तब्बल तीन वर्षानंतर केंद्र सरकारने ही बंदी घातली असून सिद्दीकीच्या इव्हेंटला हजेरी लावणाऱ्या सर्व बॉलिवूड कलाकारांची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

अमेरिकेत बॉलिवूड इव्हेंट आयोजित करणारा पाकिस्तानी रेहान सिद्दीकी हा भारतविरोधी कारवायांसाठी आयएसआय या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करत असल्याची माहिती राहुल शेवाळे यांच्या तक्रारीत देण्यात आली होती. तसेच सिद्दीकीच्या रेडिओ चॅनल, सोशल मीडियामार्फत होणारा भारतविरोधी प्रचार याचीही माहिती देण्यात आली होती. रेहान सिद्दीकीसह राकेश कौशल आणि दर्शन मेहता यांच्यावर बंदी घालून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदार शेवाळे यांनी केली होती. वॉशिंग्टनमधील भारतीय दुतावासाने भारतीय कलाकारांना, रेहान सिद्दीकी, राकेश कौशल आणि दर्शन मेहता यांच्या कार्यक्रमांमध्ये सामील न होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

काय आहे बॉलीवूड आणि अंडरवर्ल्ड कनेक्शन?

पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय दाउद त्या माध्यमातून त्यांची नावे पडद्यावर चित्रपट फायनान्स करतात. कॉल करुन धमकावतात, चित्रपटाचे परदेशी हक्क जबरदस्तीने घेतले जातात, बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांचे प्रिंट बनवून कोट्यवधींची कमाई केली जाते आणि या पैशाचा उपयोग भारताविरुद्ध आणि दहशतवादी कारवायांमध्ये द्वेष पसरवण्यासाठी केला जातो. या कामासाठीच आयएसआयने डी कंपनीच्या मदतीने दुबई इथे एक कंपनी उभी केली आहे, जिथून पैशांचं संपूर्ण नेटवर्क चालवलं जातं.

अंडरवर्ल्ड सुद्धा लावतं बॉलिवूडमध्ये हनीट्रॅप

हनीट्रॅप, भीती आणि पैसा बॉलिवूडमध्ये लावला जातो. बॉलिवूड सेलिब्रिटीसाठी सिनेमा बनवतात. सिनेमाचं प्रमोशन केलं जातं आणि या सेलिब्रिटींना जवळ करुन अंडरवर्ल्डमध्ये त्यांचा वापर स्वत:साठी करण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget