एक्स्प्लोर

Ravi Patwardhan | ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते 84 वर्षांचे होते. ठाण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं वृद्धापकाळाने निधन झालं असून ते  84 वर्षांचे होते. ठाण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रवी पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिकांमध्ये काल केलं आहे. 'अगंबाई सासूबाई' ही रवी पटवर्धन यांची शेवटची मालिका ठरली.

1944 मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी रवी पटवर्धन यांनी एका नाट्यमहोत्सवातील बालनाट्यात काम केलं होतं. या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष हे बालगंधर्व होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. आरण्यक हे नाटक रवी पटवर्धन यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केलं. त्यामध्ये त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर अगदी वयाच्या 82व्या वर्षातही या नाटकात ते तीच धृतराष्ट्राची भूमिका करत होते.

सध्या ते झी मराठीवरील 'अगंबाई सासूबाई' या मालिकेतील आशुतोष पत्की म्हणजेच, सोहमच्या आजोबांची भूमिका साकारत होते. फार कमी वेळातच रवी पटवर्धन यांनी साकरलेल्या या मालिकेतील आजोबांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. लाडावलेल्या सोहमला धाकात ठेवणारे आजोबा... आणि नातवाला 'सोम्या... कोंबडीच्या' असं म्हणणारे 'दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी' या भूमिकेतील रवी पटवर्ध यांच्यावर अख्या महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलं.

कोरोना काळात चित्रिकरणावर लावण्यात आलेली बंदी यामुळे मालिकांचं चित्रिकरण बंद करण्यात आलं होतं. दरम्यान, अनलॉकमध्ये चित्रिकरणाला परवानगी मिळाल्यानंतर एकदा दोनदा रवी पटवर्धन व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यामातून मालिकेत दिसून आले होते. त्यांच्या वयामुळे ते चित्रिकरणासाठी प्रत्यक्ष उपस्थित नव्हते.

रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्‍‌र्ह बॅंकेत नोकरी करत होते. ते ठाण्यात राहतात. नोकरीच्या कालावधीत बॅंकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली. ठाण्यातील राहत्या घरातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRatan Tata Last Rites : रतन टाटा नावाच्या झंझावाताचा अंत, मुंबईत अंत्यसंस्कार | FULL VIDEOManoj Jarange on Chhagan Bhujbal  : ओबीसीमध्ये समावेश होणाऱ्या 15 जातींना भुजबळांचा विरोध नाही का?Ratan Tata Successor : रतन टाटांच्या निधनानंतर रतन टाटांचे उत्तराधिकारी कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; 13 किंवा 14 ऑक्टोबरला शपथ घेणार
Embed widget