एक्स्प्लोर

All The Best : 'ऑल द बेस्ट' येतंय! मुका, बहिरा, आंधळ्या मित्रांची धमाल कॉमेडी 15 वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर करणार हास्यकल्लोळ

All The Best : 'ऑल द बेस्ट' हे नाटक 15 वर्षांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. मुका, बहिरा, आंधळ्या मित्रांची धमाल कॉमेडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

All The Best : मराठी रंगभूमीवर खणखणीत वाजलेलं व गाजलेलं नाटक म्हणजे देवेंद्र पेम (Devendra Pem) लिखित-दिग्दर्शित 'ऑल द बेस्ट' (All The Best). देवेंद्र पेम लिखित ही एकांकिका 90च्या दशकाच्या सुरुवातीला विशेष गाजली. 31 डिसेंबर 1993 ला या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग झाला. तीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर दाखल झालेल्या या नाटकानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आणि रंगभुमीवर मोठा इतिहासचं घडवला.

'ऑल द बेस्ट' या नाटकाने शेकडो तगडे स्टार इंडस्ट्रीला दिलेच पण भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर हे सूपरस्टार सुध्हा दिले. श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, जितेंद्र जोशी, दीपा परब, सुहास परांजपे, राजेश देशपांडे, संतोष मयेकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी या नाटकातून करिअरची सुरुवात केली.

मुका, बहिरा व आंधळा अशा मित्रांची कथा असलेलं 'ऑल द बेस्ट' हे धमाल नाटक रसिकांनी न भूतो अस उचलून धरलं. नाटकाच्या प्रयोगांचा ओघ एव्हढा प्रचंड होता की एकाच वेळी तीन टिम्स 'ऑल द बेस्ट'चे प्रयोग करत होते. दर महिन्याला साठ ते सत्तर प्रयोग व्हायचे. नाटकाच्या पहिल्या पाच वर्षात तब्बल 2100 प्रयोग झाले.

रंगमंचावर धुमाकूळ घालायला 'ऑल द बेस्ट' सज्ज!  

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल देशपांडे यांनी 'ऑल द बेस्ट' या नाटकाचं कौतुक करत देवेंद्र पेम यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.'ऑल द बेस्ट'ने केवळ मराठीचं नाही तर विविध भाषीक प्रेक्षकांनाही अक्षरशः वेड लावलं. त्यामुळे हे नाटक आजवर 12 भाषांमध्ये प्रदर्शित झालं असुन त्याचे जवळ जवळ 10,000 प्रयोग झाले आहेत. या नाटकाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. ती लक्षात घेऊन हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर धुमाकूळ घालायला सज्ज होणार आहे. नव्या दमाच्या मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील व रिचा अग्निहोत्री या कलाकारांनी नाटकाची जोरदार तालीम सुरु केली आहे.
 
'ऑल द बेस्ट' नाटकाचे लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम म्हणाले की,"या नाटकावर मराठी रसिकांनी अपार प्रेम केलं. त्यांना हे नाटक पुन्हा पाहायला निश्चित आवडेल. गेल्या 15-20 वर्षात आलेल्या नव्या पिढीला 'ऑल द बेस्ट' नाटकाचं नाव माहीत आहे. त्यांनाही हे विश्वविक्रमी नाटक पाहता यावं आणि या  नाटकाचा आस्वाद घेता यावा म्हणून आम्ही हे नाटक नवपिढीसाठी घेऊन येत आहोत".

'ऑल द बेस्ट'चा शुभारंभ कधी?

'अनामय' नाट्यसंस्थेची निर्मिती असणाऱ्या या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग 2 फेब्रुवारीपासून रंगणार आहे. नव्या नाटकातील तरुण कलाकारही या गाजलेल्या नाटकासाठी विशेष मेहनत घेताना दिसत आहेत. या नव्या संचातून जुन्या रसिक प्रेक्षकांसह नव्या प्रेक्षकवर्गालाही आनंद मिळेल यांत शंका नाही.

संबंधित बातम्या

Ajay Purkar : 'सुभेदार'नंतर अजय पुरकर यांचं रंगभूमीवर कमबॅक; 'फ्रेन्ड रिक्वेस्ट'ने उडवली खळबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Murlidhar Mohol : माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अनावर
माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अनावर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Murlidhar Mohol On Girish Bapat : गिरीश बापटांचं मताधिक्य मिळवण्याचा आमचा प्रयत्न : मोहोळMurlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहनRaosaheb Danve on Jalna Loksabha : 4 लाख मतांनी निवडणूक जिंकून येईल, रावसाहेब दानवेंना विश्वासAllu Arjun Hyderabad voting : चौथ्या टप्प्यातील मतदान, अल्लू अर्जूनने बजावला मतदानाचा हक्क

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Murlidhar Mohol : माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अनावर
माझा लेक दिल्लीला जावा अशी शेवटची इच्छा; मतदानापूर्वी मुरलीधर मोहोळांच्या आईला अनावर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Voting: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Embed widget