एक्स्प्लोर

Ajay Purkar : 'सुभेदार'नंतर अजय पुरकर यांचं रंगभूमीवर कमबॅक; 'फ्रेन्ड रिक्वेस्ट'ने उडवली खळबळ

Ajay Purkar : 'सुभेदार' या सिनेमाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर अजय पुरकर आता 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत.

Ajay Purkar New Marathi Drama : सोशल मिडीयाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या माध्यमातून ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ पाठवून नवनवीन मित्रांच्या ओळखी करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. कधी कधी आलेली एखादी अनोळखी 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' तुमचं आमचं आयुष्यही बदलू शकते. तुमचा विश्वास बसत नाही का ? मग रंगभूमीवर येणारे ‘सवाईगंधर्व’, ‘जमदग्नीवत्स’ आणि 'व्यास क्रिएशन्स' या तीन संस्थांची निर्मिती असणारे ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हे नाटक तुम्हाला पहावे लागेल. 'सुभेदार' या सिनेमाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर अजय पुरकर (Ajay Purkar) आता 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहेत.

'फ्रेन्ड रिक्वेस्ट' या नाटकाचे लेखन प्रसाद दाणी यांचे असून दिग्दर्शन कुमार सोहोनी यांचे आहे. अभिनेते अजय पुरकर, आकाश भडसावळे तसेच शैलेश देशपांडे, वैशाली गायकवाड हे या नाटकाचे निर्माते आहेत.

'फ्रेन्ड रिक्वेस्ट'ने उडवली खळबळ

चौघांचं आयुष्य एका 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' ने कसं बदलत जातं हे दाखवतानाच नात्यांचे वेगवेगळे कंगोरे आणि बंध यांचा उलगडा करणारं 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' हे सस्पेन्स, इमोशनल, कॉमिक अशा विविध मिश्रणाचं नाटक आहे. प्रसिद्ध अभिनेते आशिष पवार, मालिका अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर, अभिनेते अतुल महाजन आणि बाजीप्रभू, सुभेदार या भूमिका रंगवणारे अभिनेते अजय पुरकर हे या नाटकात मध्यवर्ती भूमिकेत आहेत.

'फ्रेन्ड रिक्वेस्ट'चा शुभारंभाचा प्रयोग कधी?

'फ्रेन्ड रिक्वेस्ट' या नाटकाचा शुभारंभ येत्या 25 जानेवारीला पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी 5 वाजता, तर 26 जानेवारीला बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री 9.30 वाजता होणार आहे. 1 फेब्रुवारी दुपारी 3.30 वा. श्री शिवाजी मंदिर,दादर येथे नाटकाचा शुभारंभ होईल.

अजय पुरकर यांनी 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' नाटकाची निवड का केली?

मोजक्याच मंडळींसोबत आजच्या पिढीचं नाटक करण्याच्या मिळालेल्या संधीमुळे या नाटकाची निर्मिती आणि अभिनय अशा दोन्ही बाजू सांभाळल्याचं अभिनेते अजय पुरकर सांगतात. दुधारी शस्त्र असलेल्या सोशल माध्यमाचा वापर आपण कशाप्रकारे करतो? हे खूप महत्त्वाचं ठरतंय. एखादी आलेली 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' आपल्या आयुष्याचा ताबा घेऊ शकते का ? याची झलक दाखवणारं हे नाटक आहे. 'कुमार सोहोनी यांच्यासारख्या अनुभवी दिग्गज दिग्दर्शकासोबत काम करायला मिळणं हा एक उत्तम अनुभव होता. उत्तम सहकलाकारांमुळे  छान  टीम तयार  झाली असून 'फ्रेन्ड रिक्वेस्ट' हे नाटक रसिकांना सुरेख अनुभव देईल' असा विश्वासही अजय पुरकर व्यक्त करतात. 

View this post on Instagram
 
A post shared by Ajay Purkar (@ajay.purkar)

'फ्रेन्ड रिक्वेस्ट' या नाटकाविषयी सांगताना दिग्दर्शक कुमार सोहोनी सांगतात की, 'फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हा लेखक प्रसाद दाणी याचा दीर्घांक; त्याचं उत्तम नाटक होऊ शकतं हे मला जाणवलं. आजच्या पिढीचं आणि नात्याच्या बंधाचा वेगळा नाट्यानुभव देणारं हे नाटक प्रेक्षकांनाही थक्क करेल असा विश्वास ते व्यक्त करतात.   

‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ नाटकाचे संगीत अशोक पत्की यांचे असून गुरु ठाकूर यांनी गीतलेखनची जबाबदारी सांभाळली आहे. नेपथ्याची बाजू संदेश बेंद्रे यांची असून सूत्रधार दिगंबर प्रभू आणि व्यवस्थापक प्रशांत माणगांवकर आहेत. 'संगीत नाटक अकादमी' हा राष्ट्रपती पुरस्कार मिळवणार्‍या कुमार सोहोनी यांनी आजवर अनेक दर्जेदार नाटकांची मेजवानी रसिकांना दिली आहे. ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ हे नाटकही रसिकांना एक वेगळीच अनुभूती देईल हे नक्की.

संबंधित बातम्या

Ajay Purkar: 'सुभेदार'नंतर आता अजय पुरकर साऊथ चित्रपटामधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस; 'स्कंदा'च्या दिग्दर्शकानं केलं तोंडभरुन कौतुक, पाहा व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Accident : मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना बाहेर काढण्यात यशEknath Shinde Ghatkopar : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना, पालघरची  सभा आटपून एकनाथ शिंदे घटनास्थळीGhatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी
Embed widget