The Kashmir Files : अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर अनुपम खेर यांचं उत्तर; म्हणाले, ' मित्रांनो, आता तर... '
अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाबद्दल काही संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही राज्यांमध्ये द कश्मीर फाइल्स हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. या चित्रपटाबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी वक्तव्य केलं. ते म्हणाले,' अनेकांचे मत आहे की द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट टॅक्स फ्री केला जावा. त्यांनी हा चित्रपट यूट्यूबवर अपलोड करावा. ज्यामुळे लोक चित्रपट फ्रीमध्ये पाहू शकतील.' त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देत अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) यांनी ट्वीट शेअर केलं आहे.
अनुपम खेर यांनी ट्वीटमध्ये लिहिले, 'मित्रांनो आता तर द कश्मीर फाइल्स हा चित्रपट चित्रपटगृहामध्येच जाऊन पाहा. तुम्ही 32 वर्षानंतर #KashmiriHindus यांचे दु:ख जाणून घेतलं. त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचार पाहिला. लोक या दुःखद घटनेची चेष्टा करत आहेत. कृपया त्यांना आपली ताकद दाखवा. ' हे ट्वीट शेअर करताना अनुपम खेर यांनी शेम या हॅशटॅगचा वापर देखील केला आहे.
अब तो दोस्तों #TheKashmirFiles सिनमा हॉल में ही जाकर देखना।आप लोगों ने 32 साल बाद #KashmiriHindus के दुःख को जाना है।उनके साथ हुए अत्याचार को समझा है। उनके साथ सहानुभूति दिखाई है।लेकिन जो लोग इस tragedy का मज़ाक़ उड़ा रहे है।कृपया उनको अपनी ताक़त का एहसास कराएँ।🙏 #Shame pic.twitter.com/ytu8vLhY9C
— Anupam Kher (@AnupamPKher) March 24, 2022
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटनांचे वर्णन करतो. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.
हेही वाचा :
- Pandit Bhimsen Joshi Award : ‘पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार 2022’, ज्येष्ठ तबलावादक भरत कामत आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक यांना जाहीर!
- Ideas Of India : स्वप्नामागे जर संकल्प असेल आणि त्यामागे आपण जाऊ, तर काहीही शक्य आहे : कैलाश सत्यार्थी
- The Kapil Sharma Show : काय म्हणता, ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा बंद होणार? जाणून घ्या...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha