एक्स्प्लोर

Telly Masala: महाराष्ट्राची हास्यजत्रामधून गौरव मोरेची एक्झिट ते 'गुलाबी साडी' गाण्याची पाकिस्तानमध्येही जोरदार क्रेझ; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Gulabi Sadi Viral Song in Pakistan : 'गुलाबी साडी' गाण्याची पाकिस्तानमध्येही जोरदार क्रेझ, व्हिडीओ होतोय व्हायरल...

Gulabi Sadi Viral Song in Pakistan : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणााऱ्या 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) या गाण्याची चांगलीच क्रेझ आहे. इन्स्टाग्रामवर या गाण्यावर मोठ्या प्रमाणावर रील्स तयार होत आहेत. या गाण्यावर फक्त मराठीच नाहीतर बॉलिवूडमधील सेलेब्सही थिरकले आहेत. गुलाबी साडी या गाण्याची क्रेझ पाकिस्तानमध्येही दिसून येत आहे. पाकिस्तानमधील या गाण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

 

Gaurav More : 'फिल्टर पाड्याच्या बच्चन'ची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून एक्झिट; गौरव मोरेची भावूक पोस्ट...

Gaurav More Maharashtrachi Hasyajatra :  छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणारा कॉमेडी शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून अभिनेता गौरव मोरेने (Gaurav More) एक्झिट घेतली आहे. मागील काही दिवसांपासून गौरव मोरे या शोमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती. अखेर आज गौरव मोरेने सोशल मीडियात पोस्ट लिहीत आपल्या निर्णयाची माहिती दिली. गौरव मोरेने हा शो सोडल्याची माहिती दिल्याने चाहत्यांना धक्काच बसला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Sarang Sathaye : 'नटसम्राट'पूर्वी 9 चित्रपट केलेत, पण ते रिलीजच झाले नाहीत; सारंग साठ्येने सांगितला सिनेसृष्टीतील अनुभव

Sarang Sathaye : रुपेरी पडद्यावर झळकावे अशी इच्छा अनेकांची असते. मात्र, त्यातील फक्त काहीजणांचे स्वप्न पूर्ण होतात. मागील  काही वर्षांपासून डिजीटल प्लॅटफॉर्मसोबत रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने मनं जिकंणारा अभिनेता, लेखक- निर्माता सारंग साठ्ये  (Sarang Sathaye) 'नटसम्राट' चित्रपटापासून प्रसिद्धीच्या झोतात आला. मात्र, नटसम्राटपूर्वी सारंगने 9 चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यापैकी दोन चित्रपट हिंदी होते. हे 9 चित्रपट काही कारणांनी प्रदर्शित झाले नाही. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Ranveer Singh Deepika Padukone : दीपवीरच्या नात्यात मिठाचा खडा! रणवीरच नाही दीपिकानं डिलीट केलेत लग्नाचे फोटो, लवकरच काडीमोड?

Ranveer Singh Deepika Padukone :   अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारे जोडपं आहे. या जोडप्यावर प्रेम करणारे अनेक चाहते आहेत. दीपिका ही गरोदर असून रणवीर तिची काळजी घेताना दिसत आहे. मात्र, मंगळवारी अचानकपणे रणवीरने आपल्या लग्नातील फोटो डिलीट केल्याने चाहत्यांना धक्का बसला. दीपिका आणि रणवीरच्या नात्यात काही बिनसलं आहे का, याची चर्चादेखील सुरू झाली आहे. दीपिकानेदेखील आपल्या इन्स्टा अकाउंटवरून लग्नाचे फोटो डिलीट केले असल्याचे समोर आले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

 

Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्रीचा हॉलिवूडमध्ये बोलबाला; सात वर्षात एकही हिट चित्रपट नाही; पण आहे सर्वात श्रीमंत अभिनेत्री!

Priyanka Chopra Fees : बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक अभिनेत्रींनी (Actress) आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. आपल्या कामाच्या माध्यमातून या अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. बॉलिवूड अभिनेत्रींचं मानधन अभिनेत्यांपेक्षा कमी असतं. पण आजच्या घडीला अभिनेत्रीदेखील तगडं मानधन घेत आहेत. काही अभिनेत्री तर अभिनेत्यांपेक्षा जास्त पैसे चार्ज करत आहेत. बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात प्रियंका चोप्राचा (Priyanka Chopra) देशभरात चांगलाच बोलबाला आहे. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही ही अभिनेत्री राज्य करताना दिसत आहे. तसेच प्रियंका चोप्रा बॉलिवूडची सर्वात श्रीमंत अभिनेत्री (Bollywood Highest Paid Actress) आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Sonakshi Sinha Heeramandi : सोनाक्षीसोबतचा 'तो' सीन अन् समोर तिची आई; हिरामंडीच्या 'उस्तादजी' म्हणाले, तिने पायानं...

Sonakshi Sinha Heeramandi :  दिग्दर्शक संजय लीला भन्साळीची (Sanjay Leela Bhansali) वेब सीरिज 'हिरामंडी' (Heeramandi) सध्या चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये कलाकारांची मांदियाळी झळकली आहे. या वेब सीरिजमधील कलाकारांचा अभिनय, कंटेटसोबत त्यांच्या इंटिमेट सीनचीदेखील चर्चा सुरू आहे. एक मे पासून 'नेटफ्लिक्स' (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही वेब सीरिज लाँच झाली आहे.आता या वेब सीरिजच्या शूटिंग दरम्यान घडलेले अनेक किस्से कलाकार सांगत आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत चित्रित करण्यात आलेल्या इंटिमेंट सीनबद्दल अभिनेता इंद्रेश मलिकने एक मजेदार किस्सा सांगितला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.. 

श्रीकांत भोसले
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला

व्हिडीओ

John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report
Shivsena BJP Seat Sharing : पालिका निवडणुकीसाठी 50-50 फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही Special Report
Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
Embed widget