एक्स्प्लोर

Telly Masala : सलमानला संपवण्यासाठी बिष्णोई गँगचा खतरनाक कट ते शुभमन गिलसोबत विवाहबद्ध होणार अभिनेत्री रिद्धीमा पंडित? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Salman Khan Firing Case : 70 भाडोत्रींकडून रेकी, अल्पवयीनला सुपारी; भाईजानला संपवण्यासाठी बिष्णोई गँगचं खतरनाक प्लानिंग


Salman Khan Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला जीवे मारण्याचा आणखी एक कट उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पनवेल पोलिसांनी (Navi Mumbai Panvel Police) चौघांना अटक केली आहे. या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या तुरुंगात असलेला बिष्णोई गँगचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोई याने सलमान खानची हत्या करण्यासाठी खतरनार प्लानिंग केले. सलमान खानच्या रेकीसाठी बिष्णोई गँगने 60 ते 70 लोकांचा वापर केला असल्याचे समोर आले आहे. तर, जीवघेणा हल्ला करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात येणार होता अशीही माहिती समोर आली आहे. 

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Shubman Gill Wedding : शुभमन गिलसोबत विवाहबद्ध होणार रिद्धीमा पंडित? अभिनेत्रीने मौन सोडत सांगितले...

Shubman Gill Ridhima Pandit Wedding : बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांच्या अफेअरची चर्चा रंगत असते. सध्या टीम इंडियाचा 'प्रिन्स' शुभमन गिल (Shubman Gill ) हा देखील चर्चेत असतो. शुभमन गिल याचे सारा सोबत नाव जोडले जात असताना दुसरीकडे त्याच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. टीव्ही अभिनेत्री रिद्धीमा पंडितसोबत ( Ridhima Pandit) शुभमन गिल विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता, यावर अभिनेत्री रिद्धिमाने आपले मौन सोडले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

 

Ramayana : 'रामायणा'मुळे रामानंद सागर 10 वर्ष अडकले होते कोर्ट-कचेरीत, काय झालं होतं नेमकं?


Ramanand Sagar Ramayana : रामानंद सागर (Ramand Sagar) यांच्या 'रामायण' (Ramayana) ही मालिका 1987 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली. या मालिकेने लोकप्रिय मालिकेचे शिखर गाठले होते. रामायण ही मालिका  वाल्मिकी रामायण आणि तुलसीदास यांच्या रामचरितमानस याच्यावर आधारीत आहे. कलाकारांचा सहजसुंदर अभियनाने प्रेक्षकांची मने जिंकली. दर रविवारी प्रसारीत होणाऱ्या मालिकेची उत्सुकता प्रेक्षकांना असायची. मात्र, रामायण मालिकेमुळे रामानंद सागर यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Prabha Shivanekar : 'गाढवाचं लग्न'मधील गंगी काळाच्या पडद्याआड, लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन 


Prabha Shivanekar :  रंगभूमीवर गाजलेल्या 'गाढवाचं लग्न'या वगनाट्यातील लोककलावंत प्रभा शिवणेकर (Prabha Shivanekar) यांचे  शुक्रवारी (दि.31 मे) निधन झाले.  वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. दमदार अभिनय, अचूक टायमिंगमुळे त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. 1950-80 च्या दशकात तुफान लोकप्रिय असलेल्या 'गाढवाचं लग्न' या वगनाट्यात त्यांनी गंगीची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. प्रभा शिवणेकर यांच्या निधनाने लोककलेतील एक तारा निखळला असल्याची भावना व्यक्त होत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.. 

 

Aashutosh Gokhale :  'आज जेव्हा कोणी जय श्रीराम म्हणतं तेव्हा भीती वाटते', अभिनेता आशुतोष गोखलेनी सध्याच्या राजकारणावर मांडली परखड मतं 


Aashutosh Gokhale :  नाटकं, मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता आशुतोष गोखले प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. घरातूनच अभिनयाचं बाळकडू आशुतोषला मिळालं. वडिल विजय गोखले आणि आजोबा विद्याधर गोखले यांच्या छायेखाली आशुतोष तयार झाला. पण तरीही आशुतोषने स्वत:च्या अभिनयाचा एक वेगळा पैलू निर्माण केला आहे. आशुतोषचे आजोबा विद्याधर गोखले यांच्यावर संघाच्या विचारांचा पगडा होता, पण ते शिवसेनेचे खासदार होते. अशातच आशुतोषने (Aashutosh Gokhale) त्याच्याही राजकीय मतांविषयी नुकतच भाष्य केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Bigg Boss OTT 3 : ठरलं! बिग बॉस ओटीटीमधून सलमानची एक्झिट, अनिल कपूर सांभाळणार होस्टची धुरा; हटके प्रोमो केला शेअर 

Bigg Boss OTT 3 Promo: रिॲलिटी शो बिग बॉस (Bigg Boss OTT 3) अनेक वर्षांपासून टीव्हीवर आहे. मागील काही वर्षांमध्ये ओटीटीवरही या कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादव होता आणि तेव्हापासून 'बिग बॉस ओटीटी' जास्त चर्चेत आलं. त्यानंतर या कार्यक्रमाचा तिसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. 'बिग बॉस ओटीटी सीझन 3' जिओ सिनेमावर प्रसारित होणार असून त्याचा प्रोमो रिलीज झाला आहे. त्याचप्रमाणे या प्रोमोमध्ये होस्टची देखील झलक दाखवण्यात आली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शपथविधीला उरले 48 तास; सागर-वर्षा बंगल्यावर खलबतंDevendra Fadnavis Eknath Shinde Meet : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावरABP Majha Headlines : 8 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Winter Session : मंत्र्यांना मिळणार 5 स्टार बंगले; हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget