Bigg Boss OTT 3 : ठरलं! बिग बॉस ओटीटीमधून सलमानची एक्झिट, अनिल कपूर सांभाळणार होस्टची धुरा; हटके प्रोमो केला शेअर
Bigg Boss OTT 3 Host: बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीजन जूनमध्ये येणार आहे. त्याचप्रमाणे या शोच्या होस्टच्या खूर्चीमध्ये कोण बसणार याचा देखील खुलासा करण्यात आला आहे.
Bigg Boss OTT 3 Promo: रिॲलिटी शो बिग बॉस (Bigg Boss OTT 3) अनेक वर्षांपासून टीव्हीवर आहे. मागील काही वर्षांमध्ये ओटीटीवरही या कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादव होता आणि तेव्हापासून 'बिग बॉस ओटीटी' जास्त चर्चेत आलं. त्यानंतर या कार्यक्रमाचा तिसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. 'बिग बॉस ओटीटी सीझन 3' जिओ सिनेमावर प्रसारित होणार असून त्याचा प्रोमो रिलीज झाला आहे. त्याचप्रमाणे या प्रोमोमध्ये होस्टची देखील झलक दाखवण्यात आली आहे.
मराठी बिग बॉस 5 ची घोषणा झाली. यामध्ये महेश मांजरेकरांची होस्ट म्हणून एक्झिट झाली. त्याचप्रमाणे रितेश देशमुखने होस्ट म्हणून एन्ट्री घेतली. हिंदीमध्येही सलमान खानने आतापर्यंत बिग बॉसचे जवळपास सर्व सीझन होस्ट केले आहेत. बिग बॉस ओटीटीचा एक सीजन करण जोहरने होस्ट केला होता आणि दुसरा सीझन सलमान खान होस्ट करत होता. आता 'बिग बॉस ओटीटी सीझन 3' येणार असून अनिल कपूर याचं होस्टिंग करणार आहे.
अनिल कपूर करणार होस्टिंग
जिओ सिनेमाच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, बिग बॉस ओटीटीच्या नवीन सीझनसाठी एक नवीन होस्ट आणि बिग बॉस प्रमाणे त्यांचा आवाजच पुरेसा आहे. बिग बॉस OTT सीझन 3 या जूनमध्ये Jio सिनेमा प्रीमियमवर येत आहे.'बिग बॉस ओटीटी सीझन 3' जून 2024 मध्ये कोणत्याही तारखेपासून सुरू होऊ शकतो. यावेळी, करण जोहर आणि सलमान खान नाही तर अनिल कपूर शो होस्ट करत आहेत.
View this post on Instagram
'बिग बॉस OTT 3' मध्ये कोण स्पर्धक असतील?
'बिग बॉस ओटीटी सीजन 3' मध्ये कोणत्याही स्पर्धकांची नावे अधिकृतपणे उघड करण्यात आलेली नाहीत. पण रिपोर्ट्सनुसार, आशिष शर्मा, प्रतीक्षा होनमुखे, शहजादा धामी, विकी जैन, शीझान खान आणि अरहान बहल यांसारखे सेलिब्रिटी या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसू शकतात. मात्र, या शोमध्ये नेमके कोण सामील होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल.