![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Prabha Shivanekar : 'गाढवाचं लग्न'मधील गंगी काळाच्या पडद्याआड, लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन
Prabha Shivanekar : 950-80 च्या दशकात तुफान लोकप्रिय असलेल्या 'गाढवाचं लग्न' या वगनाट्यात त्यांनी गंगीची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती.
![Prabha Shivanekar : 'गाढवाचं लग्न'मधील गंगी काळाच्या पडद्याआड, लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन Prabha Shivnekar folk artist famous actress Gadhvache Lagna passed away in pimpri pune Prabha Shivanekar : 'गाढवाचं लग्न'मधील गंगी काळाच्या पडद्याआड, लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/01/1855083da1cb4a52983716d2b43392bf1717212738436290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Prabha Shivanekar : रंगभूमीवर गाजलेल्या 'गाढवाचं लग्न'या वगनाट्यातील लोककलावंत प्रभा शिवणेकर (Prabha Shivanekar) यांचे शुक्रवारी (दि.31 मे) निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. दमदार अभिनय, अचूक टायमिंगमुळे त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. 1950-80 च्या दशकात तुफान लोकप्रिय असलेल्या 'गाढवाचं लग्न' या वगनाट्यात त्यांनी गंगीची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. प्रभा शिवणेकर यांच्या निधनाने लोककलेतील एक तारा निखळला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रभा शिवणकर यांनी शाहीर कॉम्रेड अमर शेख यांच्या कलापथकात तीन वर्षे काम केलं होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही सहभाग घेतला होता. प्रभा शिवणेकर यांनी 100 हून अधिक भूमिका केल्या. झाला उद्धार वाल्मीकीचा, चित्ता फाडला जावळीचा, झाशीची राणी, चोखामेळा, दिल्ली हातातून गेली आदी समाजप्रबोधनपर वगनाट्यात प्रभा शिवणेकर यांनी साकारलेल्या भूमिका अजरामर झाल्या.
प्रभा शिवणेकर यांनी वगसम्राट दादू इंदुरीकर, अभिनय सम्राट शंकरराव शिवणेकर, शाहीर अमर शेख, विठाबाई नारायणगावकर, रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर, तुकाराम खेडकर आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्याबरोबर साकार केलेल्या भूमिका अजरामर झाल्या. त्यांनी साकारलेल्या भूमिकांची भुरळ अनेकांना पडली. महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्त्व असणारे पु.ल.देशपांडे यांनी प्रभा शिवणेकर यांच्या अभिनयाची शिफारस संगीत नाट्य अकादमीला केली होती.
पुरस्कारांनी सन्मान...
संगीत नाट्य अकादमीने त्यांना 1974 मध्ये तत्कालीन राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. तर राज्य शासनाने विठाबाई नारायणगावकर पुरस्कार देऊन गौरव केला होता.
ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी 'एका गंगीची कहाणी' हे प्रभा शिवणेकर यांचे जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या चरित्रग्रंथाचे लेखन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)