एक्स्प्लोर

Salman Khan Firing Case : 70 भाडोत्रींकडून रेकी, अल्पवयीनला सुपारी; भाईजानला संपवण्यासाठी बिष्णोई गँगचं खतरनाक प्लानिंग

Salman Khan Firing Case : बिष्णोई गँगचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोई याने सलमान खानची हत्या करण्यासाठी खतरनाक प्लानिंग केले. पनवेल पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत.

Salman Khan Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याला जीवे मारण्याचा आणखी एक कट उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पनवेल पोलिसांनी (Navi Mumbai Panvel Police) चौघांना अटक केली आहे. या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या तुरुंगात असलेला बिष्णोई गँगचा प्रमुख लॉरेन्स बिष्णोई याने सलमान खानची हत्या करण्यासाठी खतरनार प्लानिंग केले. सलमान खानच्या रेकीसाठी बिष्णोई गँगने 60 ते 70 लोकांचा वापर केला असल्याचे समोर आले आहे. तर, जीवघेणा हल्ला करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात येणार होता अशीही माहिती समोर आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबर 2023 रोजी नवी मुंबईचे पोलीस अधिकारी नितीन ठाकरे यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारचे शार्प शूटर आणि त्यांच्या टोळीचे सदस्य नवी मुंबईतील पनवेल आणि कळंबोली परिसरात लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. हे आरोपी सलमान खानवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. 

पनवेल शहर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींनी सलमान खानच्या घराची आणि फार्म हाऊसची रेकी केली होती. सलमान खान कुठे जात होता याची संपूर्ण माहितीही आरोपींनी जमा केली होती.

सलमानच्या रेकीसाठी भाडोत्री माणसे...

एका अधिकाऱ्याने सांगितले की, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने 60 ते 70 लोकांना सलमान खानची रेकी करण्यासाठी भाड्याने घेतले होते. रेकी करणारे ही सगळी भाडोत्री माणसे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड आणि गुजरातमधून आणण्यात आली होती. 

ही माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली होती. अजय कश्यप नावाचा गुंड लॉरेन्स बिश्नोई टोळीसोबत काम करत होता आणि 2023  मध्ये पनवेल परिसरात आला होता.

आरोपीने पाकिस्तानमध्ये साधला होता संपर्क

नवी मुंबई पोलिसांनी अजय कश्यपला अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कश्यपने पाकिस्तानातील डोगर नावाच्या व्यक्तीशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. याच व्हिडिओ कॉलवर पाकिस्तानमध्ये राहणारा डोगर आणि त्याच्या एका साथीदाराने त्याला एके-47 सारखी शस्त्रे दाखवली. याशिवाय, सुमारे 4 ते 5 एके-47 सारखी दिसणारी अत्याधुनिक शस्त्रे दाखवली.  

आणि जेव्हा अजय कश्यपने डोगरला उरलेली शस्त्रे दाखवायला सांगितली तेव्हा डोगरच्या मागे शाल पांघरून उभ्या असलेल्या लोकांनी त्यांनी आपल्या शालीत लपवलेली शस्त्रे दाखवली. त्यानंतर अजय कश्यपने ही अत्याधुनिक शस्त्रे मागितली. त्यावर डोगर याने शस्त्रांच्या किमतीची 50 टक्के रक्कम ही कॅनडातील आमच्या बॉसला द्यावी लागेल. तर, उर्वरित 50 टक्के रक्कम ही शस्त्रे मिळाल्यानंतर रोख द्यावी लागेल असे डोगर याने सांगितले. 

सलमानवर हल्ला करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर?

सूत्रांनी सांगितले की, सलमान खानवर हल्ला करण्यासाठी बिष्णोई गँगकडून 18 वर्षाखालील मुलांना तयार करण्यात येत होते. सलमान खानवर हल्ला केल्यानंतर भारतातून बाहेर पळून जाण्याचेही प्लानिंग करण्यात आले होते. सलमान खानवर हल्ला केल्यानंतर  सर्व आरोपी हे कन्याकुमारीला पोहचणार होते. तिथे एकत्र आल्यानंतर सगळ्यांना कन्याकुमारीला पाठवण्यात येणार होते. श्रीलंकेतून या सगळ्या आरोपींना इतर वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवण्याची व्यवस्था अनमोल बिष्णोईने केली होती. 

अजय कश्यपकडून 20 मोबाईलचा वापर... 

अजय कश्यप उर्फ ​​धनंजय टेपसिंग हा कळंबोली येथे राहत असताना बिष्णोई टोळीसाठी काम करत होता आणि तो या संपूर्ण घटनेसाठी 20 हून अधिक मोबाईल फोन वापरत होता.

अटक करण्यात आलेला आरोपी अजय कश्यपने सलमान खानच्या घरावर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली होती. सलमान खान कितीही मोठ्या बुलेट प्रूफ वाहनात असला तरी त्याचे शूटर आपल्या कामात यशस्वी होणार होते असेही कश्यपने आपल्या चौकशीत सांगितले. हे आरोपी ऑगस्ट 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मुंबई, पनवेल, नवी मुंबई, पुणे, रायगड, कन्याकुमारी आणि गुजरातमध्ये राहत होते.

पोलिसांनी सांगितले की, अजय कश्यप गेल्या एक वर्षापासून काश्मीर, गंगानगर, पाकिस्तान बॉर्डर, बिहार, सिवान, गोरखपूर नेपाळ बॉर्डर, तिरुनावली आणि तामिळनाडू आदी ठिकाणी सक्रिय होता. बेकायदेशीरपणे शस्त्राशस्त्रे पुरवण्याचे अड्डे चालवत होता असा संशय पोलिसांना आहे. 

अजय कश्यप एका महिलेच्या संपर्कात... 

अजय कश्यप एका महिलेच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात समोर आली.  ही महिला आनंदपाल नावाच्या कुख्यात गुंडाची मुलगी असल्याचे समजते. हा गुंड पोलिसांच्या चकमकीत मारला गेला होता आणि आता त्याची मुलगी चिनू ही टोळी हाताळत आहे. ती देखील थेट बिष्णोई गँगला सहकार्य करणारी टोळी आहे. 

2023 साली राजस्थानमध्ये सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येनंतर अजय कश्यपने आपल्या सहकाऱ्यांना मोबाईलवर जास्त बोलू नका, असे सांगितले होते, याशिवाय संदीप बिश्नोई नावाचा व्यक्ती वरून आदेशाची वाट पाहत असल्याचे समोर आले आहे. त्याला आदेश मिळताच तो सलमान खानवर हल्ला करणार होता.

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget