एक्स्प्लोर

Telly Masala : तीन महिन्यातच 'हसताय ना हसायलाच पाहिजे'ऑफ एअर ते अरमान मलिकच्या व्हायरल क्लिपनंतर शिवसेना संतप्त; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

Marathi Serial Updates Hastay Na Hasayalach Pahije Off Air : निलेश साबळेचा 'हसताय ना हसायलाच पाहिजे' शो तीन महिन्यातच ऑफ एअर; समोर आलं महत्त्वाचं कारण...

Marathi Serial Updates Hastay Na Hasayalach Pahije Off Air :  छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची स्पर्धा जोर पकडू लागली आहे. मराठी वाहिन्यांवर नवीन मालिका, शोंचा धडाका सुरू आहे. नव्या मालिकांसाठी सध्या सुरू असलेल्या मालिका ऑफ एअर जात आहे. आता अवघ्या तीन महिन्यापूर्वी कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला कॉमेडी शो 'हसताय ना हसायलाच पाहिजे'ने (Hastay Na Hasayalach Pahije) प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Bigg Boss OTT Armaan Malik Viral Clip : बिग बॉसमध्ये अश्लील चित्रीकरण, मर्यादा ओलांडल्या जातायत, बंद करा; अरमान मलिकच्या व्हायरल क्लिपनंतर शिवसेना संतप्त

Bigg Boss OTT Armaan Malik Viral Clip : बिग बॉस ओटीटी सध्या चांगलंच चर्चेत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये राड्यामुळे हा शो चर्चेत आला होता. त्यानंतर आता  काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात अरमान मलिकची (Armaan Malik) एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली. या व्हायरल क्लिपवरून शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) आक्रमक झाला असून या शोचे चित्रिकरण बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार डॉ. मनिषा कायंदे (Armaan Malik) यांनी  मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली.  त्यावेळी ही मागणी केली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Solapur : चायनीज खाता खाता प्रेम जुळलं, मंचूरियनसोबत 'नूडल्स' फ्री मिळाले! सोलापुरातली आगळीवेगळी लव्हस्टोरी

Solapur : प्रेम ही प्रत्येकाच्या आयुष्यातली एक खास गोष्ट असते. या खास गोष्टीसाठी त्यामागे एक स्पेशल अशी स्टोरी देखील असते. कुणाचं कॉफीमुळे, कुणाचं पुस्तकामुळे अशी वेगवेगळी कारणं तुमच्या लव्हस्टोरीला कारणीभूत ठरतात. पण सोलापुरातील (Solapur) एका लव्हस्टोरीसाठी चायनीज आणि मंच्युरियन कारणीभूत ठरले आहेत. या लव्हस्टोरीची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Kiran Rao Aamir Khan : आमिरसोबतच्या घटस्फोटानंतर किरण राव आहे आनंदी; मी त्याला गमावू इच्छित नव्हती, पण...

Kiran Rao Aamir Khan : निर्माती-दिग्दर्शिका किरण रावने (Kiran Rao) आपला पूर्वाश्रमीचा पती आणि बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानसोबतच्या (Aamir Khan) नात्यावर आधी अनेकदा उघडपणे भाष्य केले आहे. तीन वर्षांपूर्वी या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेत सगळ्यांना धक्का दिला होता. मात्र, घटस्फोटानंतर दोघेही चांगले मित्र आहेत. आपल्या मुलाचे संगोपन दोघेही एकत्रितपणे करत आहेत. किरण रावने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या घटस्फोटाबाबत भाष्य केले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात दुनियादारीमधल्या कलाकाराची वर्णी लागणार? 'त्या' सोशल मीडियाच्या पोस्टमुळे भुवया उंचावल्या

Bigg Boss Marathi :  रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) होस्ट करत असलेला 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi Season 5) पाचवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 28 जुलै रोजी कलर्स मराठी वाहिनीवर हा सीझन सुरु होणार आहे. त्यामुळे सध्या या सिझनची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. पण या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून कोण सहभागी होणार याची सगळ्यात जास्त उत्सुकता प्रेक्षकांना आहे. त्यामुळे कोणते लाडके कलाकार या सिझनमध्ये सहभागी होणार हे येत्या 28 जुलैला समजेल. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

TMKOC Gurucharan Singh : घर सोडून का गेलो होतो? 'तारक मेहता का...'च्या गुरुचरण सिंहने अखेर मौन सोडलं, 'आपल्याच लोकांनी...' बातमीची लिंक कमेंटमध्ये...

TMKOC  Gurucharan Singh :  छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील व्यक्तीरेखा चांगल्याच लोकप्रिय आहेत. या मालिकेत रोशन सोढी ही व्यक्तीरेखा साकारणारे गुरुचरण सिंह हे काही महिन्यापूर्वी अचानकपणे गायब झाले होते. त्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर काही दिवसांनी स्वत:हून गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) समोर आले. कोणत्या कारणांनी आपण हे पाऊल उचलले यावर गुरुचरण सिंह यांनी मौन सोडले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?

व्हिडीओ

Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
खेळण्याच्या वयात चहाच्या दुकानात भांडी घासली, मित्रानं हात धरल्यामुळे इंडस्ट्रीची वाट गवसली, दिग्गज अभिनेत्याला ओळखलं का?
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
इम्तियाज जलील यांच्यावर 4 जणांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमधील 10 थरारक फोटो
BMC Election 2026 Rahul Narvekar: 'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
'उमेदवारी मागे घे, मी कुठल्या पदावर माहितीये ना, मुख्यमंत्र्यालाही मी बोलवल्यावर यावं लागतं'; राहुल नार्वेकरांवर धमकावल्याचा आरोप
Devendra Fadnavis & Vilasrao Deshmukh Latur: मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
मोठी बातमी : रवींद्र चव्हाणांची चूक लातूरमध्ये जाऊन सुधारली, फडणवीस म्हणाले, आमची लढाई काँग्रेसशी, पण विलासरावांबद्दल आम्हाला नितांत आदर
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
भाजपची काँग्रेस-एमआयएमसोबत युती, फडणवीस म्हणाले कारवाई करणार; हर्षवर्धन सपकाळांनी करुन दाखवलं
Embed widget