Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
Nawab Malik on Amit Satam

Nawab Malik on Amit Satam: अमित साटम लोकांची दिशाभूल करत आहेत. मागील 50 वर्षापासून बांगलादेशी आहे की नाही याचा तपास केला जात आहे. पहिल्यांदा शेख हसीना याना भारतातून बाहेर काढावं, त्यांच्यामुळे बांगलादेशमधे हिंदू अडचणीत असल्याचा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना लगावला. मुंबईत बांगलादेशींची घुसखोरी झाल्याने केंद्रीय गृह मंत्रालय कारवाई करत असल्याचे म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
तर आम्ही त्यांच्या विरोधात उभ राहू
नवाब मलिक म्हणाले की, धारावी पुनर्विकास प्रस्ताव मी २००२ साली मांडला आहे. सगळ्यांना घरे मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. धारावी विकास व्हावा अशी आमची भूमिका आधी देखील होती आणि आता देखील आहे. धारावीबाबत प्रश्न निर्माण झाल्यास अदानी विरोध करणार असतील, तर आम्ही त्यांच्या विरोधात उभ राहू असे मलिक म्हणाले.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत, मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी आमचा 'जाहीरनामा' प्रसिद्ध करण्यात आला.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 7, 2026
या जाहीरनाम्यात आम्ही शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि सुरक्षित मुंबई यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मुंबईकरांच्या… pic.twitter.com/edj0zzZ8dm
कटुता होऊ नये यासाठी एकमत
दरम्यान, राजकीय आरोपांवरून नवाब मलिक म्हणाले की, कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपने एकमेकांवर जोरदार टीका केली. परंतु, नंतर ते एकत्र आले आणि सत्तेत देखील सहभागी झाले आहेत. आमच्यात कटुता वाढू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी दोनवेळा बोललो आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी देखील बोललो, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी देखील बोललो आहे. पुढे अशी कटुता होऊ नये यावर एकमत झालं असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
























