एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Solapur : चायनीज खाता खाता प्रेम जुळलं, मंचूरियनसोबत 'नूडल्स' फ्री मिळाले! सोलापुरातली आगळीवेगळी लव्हस्टोरी

Solapur : सोलापुरातल्या एका लव्हस्टोरीची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.

Solapur : प्रेम ही प्रत्येकाच्या आयुष्यातली एक खास गोष्ट असते. या खास गोष्टीसाठी त्यामागे एक स्पेशल अशी स्टोरी देखील असते. कुणाचं कॉफीमुळे, कुणाचं पुस्तकामुळे अशी वेगवेगळी कारणं तुमच्या लव्हस्टोरीला कारणीभूत ठरतात. पण सोलापुरातील (Solapur) एका लव्हस्टोरीसाठी चायनीज आणि मंच्युरियन कारणीभूत ठरले आहेत. या लव्हस्टोरीची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. 

मागील अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवर सुरु असलेला 'होम मिनिस्टर' (Home Minister) हा कार्यक्रम आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पैठणीसाठी रंगणारा हा खेळ आजवर अनेकांसाठी खास ठरला  आहे. महाराष्ट्राचे लाडके आदेश भावोजी (Adesh Bandekar) यांचे प्रश्न आणि त्यावर वहिनींची धम्माल उत्तरं ही कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आली आहेत. अशाच एका वहिनींच्या लव्हस्टोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका वहिनींनी चायनीजचं कनेक्शन असणारी लव्हस्टोरी सांगितली. त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सध्या सोशल मीडियावर वहिनींच्या या लव्हस्टोरीची तुफान चर्चा आहे. 

वहिनींची लव्हस्टोरी काय?

वहिनींनी त्यांची लव्हस्टोरी सांगताना म्हटलं की, आमच्या लग्नाला अडीच वर्ष झालीत. आधी आठ वर्षांची आमची ओळख होती. मी चायनिज आणायला जात होते दुकानात तिथे ओळख झाली. मंच्युरियन आणायला जायचे. मग माझी मम्मी मला रोज मंच्युरियन आणायला पाठवायची. त्यावर आदेश भावोजी म्हणतात मग हे काय, मंच्युरिनयसोबत आलेत का? त्यावर कार्यक्रमात एकच हाशा पिकला. त्यावर वहिनी म्हणाल्या की, मंच्युरियनसोबत नुडल्स फ्री मिळाले. त्यावर पुन्हा आदेश बांदेकरांनी विचारलं की, ही स्किम फक्त सोलापुरात होती का? त्यावर वहिनी म्हणाल्या की, हो फक्त बाळ्यागावात होती. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या लव्हस्टोरीमुळे मंचावरचं वातावरण पूर्णपणे मिश्किल झालं. 

व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, 'देवा हिला हिचा नूडल्स मिळाला, आमच्या आयुष्यात शेव तरी भेटेल का..' तर एका युजरने कमेंट करत म्हटलं की, 'आजपासून रोज चायनीज', दुसऱ्याने कमेंट करत म्हटलं की, 'चायनिज आणताना यांना भेटला, मला दळण, कोथिंबीर, भाजी सगळे आणून दमलो पण अजून कोणीच नाही भेटलं'. आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, 'बाळ्यातलं कुठलं चायनीज नाव सांगा आम्ही पण भेट देतो चायनीजला.'

View this post on Instagram
 
A post shared by Zee5Marathi (@zee5_marathi)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात दुनियादारीमधल्या कलाकाराची वर्णी लागणार? 'त्या' सोशल मीडियाच्या पोस्टमुळे भुवया उंचावल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्रABP Majha Headlines :  2 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Embed widget