(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TMKOC Gurucharan Singh : घर सोडून का गेलो होतो? 'तारक मेहता का...'च्या गुरुचरण सिंहने अखेर मौन सोडलं, 'आपल्याच लोकांनी...' बातमीची लिंक कमेंटमध्ये...
TMKOC Gurucharan Singh : 25 दिवस अज्ञातवासात का गेलो होतो, यावर गुरुचरण सिंह यांनी मौन सोडले आहे.
TMKOC Gurucharan Singh : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील व्यक्तीरेखा चांगल्याच लोकप्रिय आहेत. या मालिकेत रोशन सोढी ही व्यक्तीरेखा साकारणारे गुरुचरण सिंह हे काही महिन्यापूर्वी अचानकपणे गायब झाले होते. त्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर काही दिवसांनी स्वत:हून गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) समोर आले. कोणत्या कारणांनी आपण हे पाऊल उचलले यावर गुरुचरण सिंह यांनी मौन सोडले आहे.
गुरुचरण सिंग बेपत्ता झाले तेव्हा त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींबाबत चर्चा सुरू झाली होती. गुरुचरण सिंह हे कर्जबाजारी असण्यापासून त्यांच्या आर्थिक अडचणींबाबत चर्चा सुरू झालेल्या. त्याशिवाय, तपासादरम्यान, गुरुचरण सिंह हे अनेक ईमेल आयडी वापरत असल्याचे उघड झाले. मात्र, गुरुचरण सिंग घरी परतले तेव्हा त्यांनी आपण आध्यात्मिक यात्रेवर होतो असे सांगत आपल्याला हिमालय गाठायचे होते असेही सांगितले.
गुरुचरण सिंह यांनी सांगितले की,'मी कर्जबाजारी झालो किंवा कर्ज फेडू शकलो नाही म्हणून मी गायब झालो नाही. माझ्यावर अजून कर्ज आहे. माझा हेतू चांगला आहे आणि कर्ज घेतल्यानंतरही मी क्रेडिट कार्ड आणि ईएमआय भरत आहे. चार वर्षापासून कामाच्या शोधात असून माझ्या वाटेला फक्त नकारच मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
25 दिवस अज्ञातवासात घालवल्यानंतर आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर, गुरुचरण सिंह यांनी सांगितले की, मी आता एक व्यक्ती म्हणून बदललो आहे. मी 25 दिवसात सगळं जग पाहिले आहे.
View this post on Instagram
आता बदललेला माणूस आहे. ते म्हणाले, 'व्यक्ती म्हणून मी बदललो आहे. मी 25 दिवसात जग पाहिले आहे. मी अध्यात्मिक यात्रेवर होतो आणि मी ते पब्लिसिटी स्टंट केला नसल्याचे गुरुचरण सिंह यांनी सांगितले. गुरुचरण सिंह यांनी सांगितले की, 'जोयापर्यंत पैशांचा प्रश्न आहे, मी अनेक निर्णय घेतले आहेत. पैसे उधार घेण्याच्या फंदात पडू नये असे मी लोकांना सुचवेन. तुम्ही कर्जानंतर कर्ज घेत राहाल. जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा तो विचार न करता ड्रायव्हरला 50 हजार रुपये देत असे आणि घर बांधताना स्वयंपाकालाही आर्थिक मदत केली होती, असेही गुरुचरण सिंह यांनी सांगितले.
आपल्या जवळच्या लोकांमुळे मनाला वेदना झाल्याने आपण तो निर्णय घेतला असल्याचे गुरुचरण सिंह यांनी सांगितले.
घर सोडण्याचे खरं कारण काय?
25 दिवस कुटुंबांपासून अज्ञातवासात जाण्यामागचे खरे कारण सांगताना गुरुचरण सिंह म्हणाले की, 'एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबापासून आणि जगापासून दूर जाता. काम मिळवण्याचा प्रयत्न करूनही मी माझ्या जवळच्या लोकांवर नाराज होतो. मला सतत नकाराचा सामना करावा लागत होता. मला माहीत होते की काहीही झाले तरी मी आत्महत्येचा विचार करणार नाही, असेही गुरुचरण सिंह यांनी म्हटले.