एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात दुनियादारीमधल्या कलाकाराची वर्णी लागणार? 'त्या' सोशल मीडियाच्या पोस्टमुळे भुवया उंचावल्या

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची उत्सुकता आता शिगेला पोहचली असून कोणते कलाकार या घरात दिसणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. 

Bigg Boss Marathi :  रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) होस्ट करत असलेला 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi Season 5) पाचवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 28 जुलै रोजी कलर्स मराठी वाहिनीवर हा सिझन सुरु होणार आहे. त्यामुळे सध्या या सिझनची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. पण या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून कोण सहभागी होणार याची सगळ्यात जास्त उत्सुकता प्रेक्षकांना आहे. त्यामुळे कोणते लाडके कलाकार या सिझनमध्ये सहभागी होणार हे येत्या 28 जुलैला समजेल. 

दरम्यान याआधी अनेक कलाकारांच्या नावांची चर्चा सुरु आहे. यामध्ये अंकिता वालावलकर, चेतन वडनेरे, विवेक सांगळे या कलाकारांच्या नावांच्या चर्चा आहेत. त्यातच आता दुनियादारी सिनेमातला एक कलाकार बिग बॉसच्या घरात सामील होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. वाहिनीकडून शेअर करण्यात आलेल्या एका सोशल मिडिया पोस्टमुळे या चर्चा रंगू लागल्यात. 

ती पोस्ट नेमकी काय?

कलर्स मराठी वाहिनीवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं की, दोस्तीच्या दुनियेतील यार, एक नंबर कलाकार कोण आहे हा? असा सवाल विचारला आहे. त्यामुळे दुनियादारी सिनेमातला कलाकार बिग बॉसच्या घरात येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. याआधी दुनियादारी सिनेमातला अभिनेता सुशांत शेलार हा बिग बॉसच्या पहिल्या पर्वात घरात दिसला होता. त्यामुळे आता या सिझनमध्ये घरात कोण दिसणार याची चर्चा सुरु झाली आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by @colorsmarathi

'हे' कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात?

वर्षा उसगांवकर या स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असंत! या मालिकेत दिसत होत्या. पण त्यांनी आता या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्या असून यावर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचं बिग बॉसच्या घरात स्वागत केलं आहे. त्यामुळे वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या घरात दिसणार का याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

अंकिता वालावलकर ही सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात अंकिताची एन्ट्री होऊ शकते. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरच्या तिच्या काही पोस्टमुळे तिला ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागतं. म्हणूनच बिग बॉसच्या घरात येणारी पहिली स्पर्धक ही अंकिता असणार का? अशा चर्चा सध्या जोर धरु लागल्या आहेत. 

दरम्यान चेतन आणि विवेक या दोघांच्याही मालिका संपून बराच काळ लोटला आहे. त्यातच त्या दोघांचे सध्या कोणते प्रोजेक्ट सुरु आहे, याबाबतही काही माहिती नाही. त्यामुळे हे दोघेही आता बिग बॉसच्या घरात दिसू शकतात. पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. 

ही बातमी वाचा : 

Varsha Usgaonkar : वेलकम टू बिग बॉस! वर्षा उसगांवकर दिसणार बिग बॉस मराठीच्या घरात? चाहत्यांच्या कमेंट्सनी चर्चांना उधाण 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Embed widget