एक्स्प्लोर

Telly Masala : बिग बॉसमध्ये सूरजच्या अंगात गुलिगत वारं संचारलं ते 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Bigg Boss Marathi : सूरजच्या अंगात गुलिगत वारं संचारलं, टास्कमध्ये उडी मारुन वाऱ्यासारखा तिघांना घेऊन गेला; कॅप्टन्सी टास्कमध्ये पुन्हा एकटा भिडला

Bigg Boss Marathi Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क सुरु आहे. बिग बॉसच्या घरातील पहिल्या कॅप्टनचा कार्यकाळ संपला आहे, आता नवीन कॅप्टन होण्यासाठी इतर स्पर्धक बाजी लावताना दिसत आहे. या कॅप्टन्सी कार्यामध्ये दोन टीममध्ये स्पर्धा लागल्याचं पाहायला मिळालं. महत्त्वाचं म्हणजे बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सी टाक्समध्ये सूरज चव्हाण अरबाजला गुलिगत नडल्याचं पाहायला मिळालं. सूरज चव्हाणनं वैभव चव्हाणला अडवलं. सूरजचा टास्कमधील खेळ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.. 

Gurucharan Singh : "काहीही न सांगताच मला मालिकेमधून बाहेर फेकलं", तारक मेहता फेम सोढीचा निर्मात्यांवर गंभीर आरोप; गुरुचरण सिंह म्हणाला, 'मी शो सोडला नव्हता'

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चष्मा गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेमध्ये भूमिका साकारणाऱ्या अनेक कलाकारांना घराघरांत प्रसिद्धी मिळाली. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील सोढीची भूमिका साकारणाऱ्या गुरुचरण सिंह यांनाही या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. तारक मेहता फेम गुरुचरण सिंह उर्फ सोढी यांनी आता मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Navra Maaza Navsaacha 2 : 80 कोटीचे हिरे आता 800 कोटीचे, यंदा गणपतीपुळेचा प्रवास कोकण रेल्वेने; 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच

Navra Maaza Navsaacha 2 Movie Release Date : नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता लागून आहे. नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच करण्यात आला आहे. हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. यंदा गणपतीपुळेचा प्रवास लाल परीने नाही तर कोकण रेल्वेने होणार आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Bigg Boss Marathi Season 5 : डीपी दादाने आर्याचं खाणं-पिणं काढलं, थर्ड क्लास लोकांच्याबद्दल...; 'बिग बॉस मराठी'च्या वादाचा कल्ला

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात पहिल्या दिवसापासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरातल्या अनेक सदस्यांमध्ये वाद सुरू झाले आहेत. आता गटातील सदस्यांमध्येही वादावादी सुरू झाली असल्याचे चित्र आहे. निक्की-अरबाजच्या गटात नाराजीचा सूर उमटत असतो. पण आता धनंजय पोवार (Dhananjay Powar) अर्थात डीपी दादा आणि  आर्यामध्येच वादाची ठिणगी पडली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

 

Ayushmann Khurrana : 'काश! मैं भी लड़का होती', कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर आयुष्मान खुरानाची कविता, एक-एक शब्द ऐकून अंगावर येईल काटा


मुंबई : पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये डॉक्टर तरुणीची हत्या आणि बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेविरोधात देशभरात आक्रोश पाहायला मिळत आहे. याचा निषेध करत डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. देशभरात याचा निषेध होत असतानाच बॉलिवूड कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया मांडली आहे. अभिनेता आयुष्मान खुराना याने कोलकाता निर्भया कांडवर कविता लिहिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

 

Kolkata Doctor Case : कोलकाता 'निर्भया कांड'वर बॉलिवुड सेलिब्रिटींची संतप्त प्रतिक्रिया; स्वरा भास्कर, आलिया भटसह इतर कलाकारांची सरकारकडे मागणी


मुंबई : कोलकातामधील रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत घडलेल्या निघृण कृत्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. 31 वर्षीय महिला डॉक्टरसोबत माणुसकीला काळिमा फासणारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या सेमिनॉर हॉलमधेच पीडितेवर आधी बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर संतापाची लाट उसळली आहे. अनेक लोक रस्त्यावर उतरले असून न्याय मिळण्याची मागणी करत आहेत. या घृणास्पद घटनेवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

OTT Release This Week : लाँग वीकेंडला रोमँटिक, कॉमेडी ते अॅक्शनपटाचा तडका; या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

OTT Release This Week : सलग सुट्ट्या आल्याने अनेकांसाठी हा लाँग वीकेंड ठरला आहे. या लाँग वीकेंडला तुम्ही बाहेरगावी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला नसाल तर तुम्हाला घरबसल्या चित्रपटांचा आनंद घेता येऊ शकतो. या आठवड्यात (12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट) प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wardha  Bhugaon Factory Accident : वर्ध्यात भुगावमधील एवोनिथ कंपनीत स्फोट, 22 कामगार जखमीManisha Kayande On Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांनी शिवाजी महराजांचा अपमान केलाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 07 November 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स-Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Donald Trump Narendra Modi: डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संवाद साधणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते ठरले; दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?
Nashik Crime: विधानसभा निवडणुकीच्या काळात नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, बेरोजगार तरुणांच्या मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटींची रक्कम जमा
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, 12 बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यात अचानक 125 कोटींची रक्कम डिपॉझिट
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
Embed widget