Nilesh Sable Bhau Kadam Comeback On Zee Marathi: आता कमबॅक होणार! निलेश साबळे, भाऊ कदमची जोडगोळी पुन्हा झी मराठीवर झळकणार, पण, 'चला हवा येऊ द्या' नाही, तर 'या' शोमध्ये दिसणार?
Nilesh Sable Bhau Kadam Comeback On Zee Marathi: निलेश साबळे, भाऊ कदम पुन्हा झी मराठीवर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघांचंही झी मराठीवर दणक्यात पुनरागमन होणार आहे.

Nilesh Sable Bhau Kadam Comeback On Zee Marathi: महाराष्ट्रातल्या (Maharashtra) घराघरांत पोहोचलेला, प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे, 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya). तब्बल 10 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2024 मध्ये या कार्यक्रमानं निरोप घेतला. त्यानंतर काही दिवसांनी मराठमोळ्या कार्यक्रमाचं (Marathi Show) नवं पर्व झी मराठीवर (Zee Marathi) सुरू झालं. पण, नव्या पर्वात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. त्यातला महत्त्वाचा आणि प्रेक्षकांना खटकलेला बदल म्हणजे, 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणारे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेले निलेश साबळे आणि भाऊ कदम. ही जोडगोळी नव्या पर्वात दिसणार नाही, हे कळल्यावर अनेकांचा हिरमोड झाला. पण, आता सर्व चाहत्यांसाठी एक गूड न्यूज आहे. निलेश साबळे, भाऊ कदम पुन्हा झी मराठीवर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघांचंही झी मराठीवर दणक्यात पुनरागमन होणार आहे. पण, हा कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' नाही, तर नव्या कार्यक्रमातून दोघेही दणक्यात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
निलेश साबळे, भाऊ कदमचं कमबॅक
महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलेले मराठमोळे चेहरे म्हणजे, निलेश साबळे आणि भाऊ कदम. दोघेही आता झी मराठीवर कमबॅक करणार आहेत. झी मराठीच्या ऑफिशिअल इन्स्टा हँडलवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ब्लॅक अँड व्हाईट असून भाऊ कदम आणि निलेश साबळे एकदम स्टायलिश अंदाजात पाहायला मिळत आहेत. प्रोमोमध्ये दोघेही पाठमोरे उभे आहेत, त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. तरीसुद्धा चाहत्यांनी त्यांच्या लाडक्या कलाकारांना अचूक ओळखलं आहे. निलेश आणि भाऊ 'चला हवा येऊ द्या' नव्हे तर वेगळ्याच शोमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे दोघे आता काय घेऊन येणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
View this post on Instagram
झी मराठीच्या इन्स्टा हँडलवर व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन देण्यात आलंय. त्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "बाकीच्यांचं COMEBACK होणार असेल 2026 वर्षात, आपलं COMEBACK 2025 मध्येच होणार! 'उगाच' नाही....बघाच 🔥 लवकरच..."
दरम्यान, 'चला हवा येऊ द्या'च्या यंदाच्या पर्वात शोचा कर्ताधर्ता आणि पहिल्यापासून या कार्यक्रमाची घडी ज्यानं बसवली, तो डॉ. निलेश साबळे (Dr. Nilesh Sabale) मात्र दिसणार नाही. हे कळल्यानंतर प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झाला होता. वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या अखेर खुद्द डॉ. निलेश साबळेनं समोर येत, इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे तो आणि भाऊ कदम 'चला हवा येऊ द्या'मध्ये दिसणार नसल्याचं सांगितलेलं. त्यानंतर आता महाराष्ट्राचे दोन लाडके कलाकार कमबॅक करत असल्याचं ऐकून चाहते आनंदी झाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























