Bigg Boss Marathi Season 5 : डीपी दादाने आर्याचं खाणं-पिणं काढलं, थर्ड क्लास लोकांच्याबद्दल...; 'बिग बॉस मराठी'च्या वादाचा कल्ला
Bigg Boss Marathi Season 5 : निक्की-अरबाजच्या गटात नाराजीचा सूर उमटत असतो. पण आता धनंजय पोवार अर्थात डीपी दादा आणि आर्यामध्येच वादाची ठिणगी पडली आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात पहिल्या दिवसापासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. घरातल्या अनेक सदस्यांमध्ये वाद सुरू झाले आहेत. आता गटातील सदस्यांमध्येही वादावादी सुरू झाली असल्याचे चित्र आहे. निक्की-अरबाजच्या गटात नाराजीचा सूर उमटत असतो. पण आता धनंजय पोवार (Dhananjay Powar) अर्थात डीपी दादा आणि आर्यामध्येच वादाची ठिणगी पडली आहे.
बिग बॉसच्या घरात सध्या दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांमध्ये टास्कशिवायही इतर वेळी एक कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू असतात. आता, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जेवणावरुन आर्या आणि डीपीमध्ये वाद झाला असल्याचे दिसत आहे. या प्रोमोत डीपीने आर्याचं खाणं-पिणं काढलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोमध्ये डीपी आर्याला म्हणतो की,"मला असं वाटतं की तु कमी खावं". त्यावर आर्या म्हणते,"माझ्या जेवणावर कमेंट करायची नाही... मी एकदा जेवण करेल..दोनदा जेवण करेल..तुम्ही मला सांगू नका"". त्यावर धनंजय आर्याला म्हणतो,"तू तोंड बंद कर मग". तर आर्या तोंड बंद करण्यास नकार देते. यावर धनंजय तिला तावाने म्हणतो,"मग मी तुला खाताना बोलणार". त्यावर आर्या म्हणते की, मी इकडं कोणाचंही ऐकायला आले नाही. धनंजय देखील म्हणतो की, मी म्हटलं का, तू माझं ऐकायला आलीस. त्यानंतर पुढच्या सीनमध्ये डीपी म्हणतो की, थर्ड क्लास लोकांच्याबद्दल मी बोलतच नाही. या वादावादीत आर्या दुखावली असल्याचे प्रोमोत दिसून आले आहे.
View this post on Instagram
निक्की आणि अरबाजमध्ये वादाची ठिणगी
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात प्रेक्षकांना जान्हवीमुळे अरबाज आणि निक्कीमध्ये खटके उडताना दिसणार आहेत. घरातील हा दंगा पाहताना प्रेक्षकांना मात्र मजा येईल. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल पहिल्या दिवसापासून एकमेकांच्या मैत्रीबद्दल पॉझिटिव्ह असल्याचं पाहायला मिळालं. पण आता मात्र त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
तिसऱ्या आठवड्यात बिग बॉस सदस्यांना आणखी कोणते नवे टास्क देणार, याविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता आहे. 'कलर्स मराठी'वर बिग बॉस मराठी हा रिएल्टी शो दररोज रात्री 9 वाजता प्रसारीत होतो. तसेच Jio Cinema वरदेखील या कार्यक्रमाचे अपडेट्स पाहता येतील.