एक्स्प्लोर

OTT Release This Week : लाँग वीकेंडला रोमँटिक, कॉमेडी ते अॅक्शनपटाचा तडका; या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

OTT Release This Week : या आठवड्यात (12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट) प्रेक्षकांसाठी ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी आहे.

OTT Release This Week : सलग सुट्ट्या आल्याने अनेकांसाठी हा लाँग वीकेंड ठरला आहे. या लाँग वीकेंडला तुम्ही बाहेरगावी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला नसाल तर तुम्हाला घरबसल्या चित्रपटांचा आनंद घेता येऊ शकतो. या आठवड्यात (12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट) प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी आहे.

ओटीटी प्रेक्षकांसाठी मागील आठवडा चांगलाच ठरला. चंदू चॅम्पियन ते इंडियन 2 सारखे चित्रपट रिलीज झाले. तर, 'फिर आयी हसीन दिलरुबा' आणि 'ग्यारह ग्यारह' सारख्या चित्रपट, वेब सीरिजने थ्रिलरपटाची आवड असणाऱ्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले. एकीकडे 'स्त्री 2', 'खेल खेल में', 'वेदा' आणि 'डबल स्मार्ट' सारखे चित्रपट या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित होत असताना, दुसरीकडे, ओटीटीवरही चांगले पर्याय आहेत. 

शेखर होम 

या आठवड्यात शेखर होम ही वेब सीरिज रिलीज झाली आहे. या वेब सीरिजमध्ये के के मेनन हा एका खासगी डिटेक्टिवच्या भूमिकेत आहे. तो शेरलॉक होम्सपासून प्रेरणा मिळाली आहे. 

1990 च्या दशकाच्या सुरुवातीला बंगाल मधील शहर लोनपूरमध्ये ही कथा बेतलेली आहे. या मालिकेची कथा शेखरभोवती फिरते कारण तो न उलगडलेल्या रहस्यांच्या जाळ्यात अडकतो. त्याची डॉ. जयव्रत साहनी (रणवीर शौरी) याच्याशी मैत्री होते, जो दुसरा मध्यमवयीन बॅचलर आहे. दोघे पूर्व भारतातील रहस्यमय  प्रकरणे हाताळू लागतात. या वेब सीरिजमध्ये कीर्ती कुल्हारी, रसिका दुग्गल आणि उषा उथुप यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ही वेब सीरिज 14 ऑगस्टपासून OTT प्लॅटफॉर्म JioCinema वर स्ट्रीम होत आहे. 

इंडस्ट्री सीझन 3 

इंडस्ट्री सीझन 3 मध्ये आंतरराष्ट्रीय वित्तीय जगतात आता आणखी मोठ्या घडामोडी घडणार आहेत. 
पिअरपॉइंट अँड कंपनी एक धाडसी पाऊल उचलते. या सीझनची कथा ही सर हेन्री मॉक यांच्या (किट हॅरिंग्टन) ग्रीन टेक एनर्जी कंपनी 'लुमी'च्या हाय-प्रोफाइल आयपीओभोवती फिरते. फर्म आपले भविष्य ठरवत असताना, यास्मिन (मारिसा अबेला), रॉबर्ट (हॅरी लॉटी) आणि एरिक (केन लेउंग) सारख्या व्यक्तिरेखा या पैसे, मीडिया आणि सरकार यांच्यात अडकतात. दरम्यान, हार्पर स्टर्नला (Myhala Herold), पिअरपॉईंटमधून काढून टाकण्यात आले होते, ती परत येण्याचा मार्ग शोधते. 

ही वेब सीरिज  12 ऑगस्टपासून रोजी OTT प्लॅटफॉर्म JioCinema वर स्ट्रीम होत आहे. 

डाउटर्स 

नॅटली रे आणि अँजेला पॅटन यांचे दिग्दर्शन असलेली हा चित्रपट इमोशनल बायोपिक आहे. हा चित्रपट चार मुलींच्या कठीण आणि भावनिक जीवनावर आधारित आहे. या माहितीपटात वडील आणि मुलीचे नाते अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने दाखवण्यात आले आहे. 'डाउटर्स' माहितीपटासाठी पुरस्कारही मिळाला. 14 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झाला आहे. 

जॅकपॉट 

भविष्यकाळातील कॅलिफोर्नियातील ही कथा आहे. अभिनेत्री होण्याची इच्छा असलेली केटी किम ही  नकळतपणे कुख्यात ग्रँड लॉटरीची विजेती होते. या खेळानुसार, कोणतीही व्यक्ती सूर्यास्तापर्यंत केटीला ठार करून कायदेशीर मार्गाने हा जॅकपॉट आपल्या नावे करू शकतो. आता, केटी काय करणार? केटीच्या मदतीला कोण येणार, केटीच्या जीवावर कोण उठलं आहे, याचा उलगडा चित्रपटात होईल. 

हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी व्हिडीओवर रिलीज झाला आहे. 

चमक: द कन्क्लूजन

काला (परमवीर सिंग चीमा) हा या सीरिजच्या केंद्रस्थानी आहे. काला हा पंजाबी संगीत उद्योगातील उजेडात न आलेले पैलू उलगडतो. तो त्याच्या वडिलांच्या स्टेजवरील रहस्यमय खुनामागील सत्य शोधत आहे. याचा बदलाही त्याला घ्यायचा आहे. सत्ता, वारसा आणि विश्वासघात यांची कथा सीरिजमध्ये आहे. 

'चमक: द कन्क्लुजन' ही वेब सीरिज सोनी लिव्हवर 16 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे.

द युनियन 

स्पाय-ॲक्शन-कॉमेडी-थ्रिलर 'द युनियन'मध्ये मार्क वाहलबर्गने माईक या न्यू जर्सीतील एका कामगाराची भूमिका केली आहे. शालेय जीवनातील त्याची प्रेयसी रॉक्सॅन ही त्याच्या आयुष्यात पुन्हा आल्यानंतर त्यांचे आयुष्य बदलून जाते. त्यांच्या आयु्ष्यात अशा घडामोडी घडतात की ते अमेरिकेच्या गुप्त मोहिमेचा भाग होतात. 

हा चित्रपट 16 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. 

वर्स्ट एक्स लव्हर

ही एक डॉक्युमेंटरी आहे. यामध्ये प्रेमाची काळी बाजू दाखवण्यात आली आहे. यामध्ये ब्रेकअपच्या वेदना, त्याचे दु:ख, त्यातून बाहेर पडण्यासाठी एखादी व्यक्ती काय करू शकते हे दाखवण्यात आले आहे. 

ही डॉक्युमेंटरी  14 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. 

इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरीMahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाहीDevendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपलीBJP On congress : काँग्रेसला संविधान कोरं कारायचं आहे, भाजपची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
Bhaskar Jadhav : रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
Amit Thackeray: माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
Embed widget