(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi : सूरजच्या अंगात संचारलं गुलिगत वारं, टास्कमध्ये उडी मारुन वाऱ्यासारखा तिघांना घेऊन गेला; कॅप्टन्सी टास्कमध्ये पुन्हा एकटा भिडला
Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सी टाक्समध्ये सूरज चव्हाण अरबाजला गुलिगत नडल्याचं पाहायला मिळालं.
Bigg Boss Marathi Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या कॅप्टन्सी टास्क सुरु आहे. बिग बॉसच्या घरातील पहिल्या कॅप्टनचा कार्यकाळ संपला आहे, आता नवीन कॅप्टन होण्यासाठी इतर स्पर्धक बाजी लावताना दिसत आहे. या कॅप्टन्सी कार्यामध्ये दोन टीममध्ये स्पर्धा लागल्याचं पाहायला मिळालं. महत्त्वाचं म्हणजे बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सी टाक्समध्ये सूरज चव्हाण अरबाजला गुलिगत नडल्याचं पाहायला मिळालं. सूरज चव्हाणनं वैभव चव्हाणला अडवलं. सूरजचा टास्कमधील खेळ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
कॅप्टन्सी टाक्समध्ये टीम ए आणि टीम बी यांना बोटीमध्ये मोती गोळा करण्याचं कार्य देण्यात आलं आहे. ज्या टीमच्या बोटीमध्ये जास्त मोती जमा होणार, ती टीम जिंकणार आणि त्या टीममधील सदस्य कॅप्टन होण्यासाठी दावेदार असतील. या टास्कमध्ये बिग बॉसच्या घरात खूपच कल्ला आणि राडा पाहायला मिळाला. टीम ए मध्ये निक्की, अरबाज, जान्हवी, योगिता, सूरज आणि घनश्याम हे सदस्य आहेत. तर टीम बी मध्ये अभिजीत, आर्या, वैभव, इरिना, अंकिता, डीपी हे आहेत. वर्षा उसगांवकर कार्याच्या संचालक असण्यासोबतच टीम बी च्या सदस्यदेखील आहेत.
टास्कमध्ये सर्व सदस्य बिग बॉसने दिलेले मोती गोळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे. दरम्यान, टीम ए मध्ये अरबाज खजिन्यातून मोती आणतो आणि त्यानंतर ते पिशवीत घालण्याचा प्रयत्न करतो, यावेळी विरुद्ध टीममधील सदस्य त्यामध्ये व्यत्यय आणण्याचा आणि त्याच्यासाठी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अरबाजच्या विरुद्ध टीममध्ये असलेले वैभव आणि धनंजय अरबाजकडून मोती काढून घेण्याचा प्रयत्न करतात, यावेळी अरबाज वैभव आणि धनंजय यांच्यामध्ये फसला जातो. यावेळी सूरज चव्हाण त्याच्या मदतीला धावत येतो.
आपल्या टीममधील सदस्य अरबाज अडचणीत सापडल्याचं दिसताच सूरज त्याच्या मदतीला जातो. सूरज यावेळी उडी मारुन एन्ट्री घेतो आणि सूर मारुन तिघांना वाऱ्यासारखा घेऊन जातो. एकटा सूरज तिघांना गुलिगत सरकवत नेत असल्याचं व्हिडीओ समोर आल्यानंतर प्रेक्षक चकित झाले आहेत. नेटकरी सूरजला फुल सपोर्ट करताना दिसत आहेत.
सूरज चव्हाण एकच नंबर
View this post on Instagram
'या' सदस्यांवर नॉमिनेशनची तलवार
'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या आठवड्यात चार सदस्यांवर नॉमिनेशनची तलवार आहे. या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर होण्यासाठी सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे चार सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या चौघांपैकी या आठवड्यात कोण 'बिग बॉस मराठी'च्या घराबाहेर जाणार हे पाहावं लागणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :