एक्स्प्लोर

Telly Masala : पुण्यात दहीहंडी कार्यक्रमात निक्कीचा जलवा; पाहा व्हिडीओ ते 'सूर्याची पिल्ले' नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : सध्या मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli : बाईSSSS! पुण्याच्या दहीहंडी कार्यक्रमात निक्कीचा जलवा; वातावरण तापलं, VIDEO पाहा

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli :  'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi Season 5) यंदाच्या सीझनची जोरदार चर्चा सुरू आहे. या सीझनमधील स्पर्धकांनी आपल्या खेळाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.  घरातील टास्क, वादावादी, अनौपचारिक गप्पांकडे प्रेक्षकांचे लक्ष असते. या सीझनमध्ये घरातील स्पर्धक मॉडेल-अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) हिची चांगलीच चर्चा रंगली आहे. बिग बॉसच्या घराबाहेरही निक्की चर्चेत आहे. पुण्यातील दहीहंडी उत्सवातही त्याची झलक दिसून आली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Tikdam Movie Review : तिकडम चित्रपट रिव्ह्यू; अमित सियालचा दमदार अभिनय

Tikdam Movie Review : जर आपण वाईट सिनेमावर टीका केली तर चांगल्या सिनेमाची स्तुती करायची हिंमत असली पाहिजे. कलाकाराने वाईट अभिनय केला असेल तर टीकाही करावी. पण चांगले काम केल्यास त्याचे तोंडभरून कौतुक करायला हवं. जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिकडम हा चित्रपट रिलीज झाला आहे. ना कोणतं प्रमोशन, ना कोणता आवाज-गडबड गोंधळ... मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर या चित्रपटाची चर्चा का नाही, असा प्रश्न मनात निर्माण होतो. चित्रपटाची टीम आपल्या ताकदीनुसार चित्रपट प्रमोट करत आहेत आणि त्यांनी हा चित्रपट लोकांपर्यंत न्यायला हवा. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Marathi Natak Suryachi Pille : 'सूर्याची पिल्ले' नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर, रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये रंगणार शुभारंभाचा प्रयोग

Marathi Natak Suryachi Pille :  मराठी रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटवणारे नाटक 'सूर्याची पिल्ले' (Suryachi Pille) पुन्हा एकदा रंगभूमीवर नाट्यप्रेमींच्या भेटीसाठी येणार आहे. सुनील बर्वे यांनी 'हर्बेरियम' उपक्रमांतर्गत काही अभिजात नाटकांचे 25  प्रयोग रंगभूमीवर सादर केले होते. त्यापैकी एक वसंत कानेटकर लिखित 'सूर्याची पिल्ले' या नाटकाचा समावेश होता.  सूर्याची पिल्ले रंगभूमीवर आल्यावर प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. आता पुन्हा एकदा हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

Kangana Ranaut Office : पालिकेनं कारवाई केलेला बंगला विकून कंगना रणौतने खरेदी केलं महागडं ऑफिस, कोट्यवधींची डील

Kangana Ranaut New Office in Mumbai : लोकसभा खासदार अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईत महागडी मालमत्ता खरेदी केल्याचं समोर येत आहे. कंगना रणौतनं मुंबईतील अंधेरी येथे उच्चभ्रू ठिकाणी जागा खरेदी केली आहे. कंगना या ठिकाणी आपलं नवीन ऑफिस सुरु करण्याच्या तयारीत आहे. कंगनाने या मालमत्तेसाठी 23 ऑगस्ट रोजी 9,37,500 रुपये स्टँम्प ड्युटी भरली आहे. कंगना रणौतने अंधेरी येथे सुमारे 1.56 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, कंगनाने वांद्रे येथील बंगला विकल्याचंही सांगितलं जात आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Bigg Boss Marathi Season 5 :  'बिग बॉस मराठी'च्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर पडणार? समोर आलाय मोठा ट्वीस्ट...

Bigg Boss Marathi Season 5 :  'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) घरातला पाचवा आठवडा सुरू झाला आहे. घरातील सगळेच सदस्य आपला रंग दाखवू लागले आहेत.  पाचव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर आता चार सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात घराबाहेर कोण पडणार, याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एक मोठा ट्वीस्ट समोर आला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Suhasini Deshpande : ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे काळाच्या पडद्याआड, मराठी कलासृष्टीवर शोककळा 

Suhasini Deshpande passes away :  मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे (Suhasini Deshpande) यांचं निधन झालं आहे. पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी सुहासिनी देशपांडे यांनी अखेरचा श्वास घेतला. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहे. दरम्यान सुहासिनी यांच्या जाण्याने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

Mohanlal : अभिनेत्रींचा लैंगिक शोषणाचा आरोप, मोहनलाल यांचा राजीनामा;मल्याळम सिनेसृष्टीत मोठी उलथापालथ  

Mohanlal Resigns  : मल्याळम सिनेसृष्टीत सध्या बरीच खळबळ माजत असल्याचं पाहायला मिळतंय. हेमा समितीकडून मल्याळम सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींचं लैंगिक शोषण होत असल्यासंदर्भात अहवाल समोर आला होता. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल (Mohanlal) यांनी आता AMMS म्हणजेच  ‘असोसिएशन ऑफ मल्याळम मुव्ही आर्टिस्ट’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हेमा समितीचा अहवाल आल्यानंतरही त्यांनी मौन धारण केलं होतं. पण आता त्यांच्यासह या समितीमधील अन्य काही सदस्यांनी देखील त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ICC Women's T20 World : Tejaswini Pandit Ek Number Movie  : तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला 'येक नंबर' सिनेमाABP Majha Headlines : 11.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra News:विदर्भात महायुतीतले वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे,वळसे पाटलांवर आशिष देशमुखांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला
Amol Mitkari: 'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
Embed widget