Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातून या आठवड्यात कोण बाहेर पडणार? समोर आलाय मोठा ट्वीस्ट...
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीत या आठवड्यात घराबाहेर कोण पडणार, याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एक मोठा ट्वीस्ट समोर आला आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) घरातला पाचवा आठवडा सुरू झाला आहे. घरातील सगळेच सदस्य आपला रंग दाखवू लागले आहेत. पाचव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर आता चार सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात घराबाहेर कोण पडणार, याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एक मोठा ट्वीस्ट समोर आला आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात नॉमिनेशनसाठी मानकाप्या भूताची गुहा हा टास्क पार पडला. या टास्कमध्ये बिग बॉसने घरातील सदस्यांची जोडी तयार केली होती. त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी दोन जोडी नॉमिनेट करण्यास सांगितले होते. मात्र, नॉमिनेशच्या झाडावर आपले नाव असल्यास सदस्याला ते नाव वगळण्याची मुभा नव्हती. त्याशिवाय, या टास्कबाबत कोणासोबतही चर्चा करण्यास मनाई होती.
कोण झाले नॉमिनेट
पाचव्या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर निक्की, अभिजीत, वर्षा आणि अरबाज हे सदस्य नॉमिनेट झालेत. नॉमिनेशनसाठी मानकाप्या हे कार्य पार पडलं. घरातील सदस्य हे सध्या जोड्यांमध्ये बांधले गेले आहेत. त्यामुळे नॉमिनेशनही जोड्याचं झालं. यामध्ये वर्षा अंकिता ही जोडी आणि निक्की अभिजीत ही जोडी नॉमिनेट झाली.
समोर आलाय मोठा ट्वीस्ट...
घरातील सदस्य नॉमिनेट झाल्यानंतर या आठवड्यात घराबाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी मते द्यावी लागतात. मात्र, वोटिंग लाइन बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात एकही सदस्य घराबाहेर जाणार नसल्याचे स्पष्ट आहे. याच्या परिणामी घरातून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झालेले निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर आणि वर्षा उसगांवकर हे सदस्य घराबाहेर पडणार नाहीत. मात्र, वीकेंडला 'भाऊच्या धक्क्यावर' होस्ट रितेश देशमुख आणखी काही आश्चर्याचा धक्का देणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, निक्कीने टीम A ला रामराम केल्यानंतर तिला आता अभिजीतचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे. आता किती दिवस निक्की आणि अभिजीतची जोडी एकत्र दिसेल याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. पण त्यांची मैत्री मात्र लक्ष वेधून घेत आहे.