एक्स्प्लोर

Suhasini Deshpande : ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे काळाच्या पडद्याआड, मराठी कलासृष्टीवर शोककळा 

Suhasini Deshpande passes away : मराठी कालविश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन झालं आहे. 

Suhasini Deshpande passes away :  मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे (Suhasini Deshpande) यांचं निधन झालं आहे. पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी सुहासिनी देशपांडे यांनी अखेरचा श्वास घेतला. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहे. दरम्यान सुहासिनी यांच्या जाण्याने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. 

सुहासिनी देशपांडे यांनी मराठीसह हिंदीतील अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अनेक सिनेमांमधून सुहासिनी यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्या रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम या सिनेमातही दिसल्या होत्या. आता त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झाल्याची भावना आहे. 

सुहासिनी देशपांडे यांचा सिनेसप्रवास...

सुनासिनी देशपांडे मनाचा कुंकू (1981), कथा (1983), आज झाले मुक्त मी (1986), आई शप्पथ...! (2006), चिरंजीव (2016), धोंडी (2017) या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याचप्रमाणे सिंघम या सिनेमातही त्या झळकल्या होत्या. कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेलं चुलीत आणि सासुबाईंचं असंच असतं नाटकांमधूनही त्या रंगभूमीवर दिसल्या होत्या. त्यांच्या रंगभूमीवरील योगदानासाठी आणि कार्याबद्दल सुहासिनी देशपांडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने 2015 साली सन्मानित करण्यात आलं. 

सुप्रिया सुळेंनी वाहिली श्रद्धांजली

खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी पोस्ट करत म्हटलं की, 'ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन झाल्याची बातमी दुःखद आहे. त्यांनी वयाच्या अगदी बाराव्या वर्षापासून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी देवकीनंदन गोपाला , वारसा लक्ष्मीचा , काळूबाईच्या नावानं चांगभलं , पुढचं पाऊल आदी काही चित्रपटांत तर 'तुझं आहे तुझ्यापाशी' , 'कथा अकलेच्या कांद्याची', लग्नाची बेडी आदी अनेक नाटकांसह काही वगनाट्यांमध्ये काम केले. त्यांच्या निधनामुळे मराठी कलासृष्टीतील अनुभवी, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.'

ही बातमी वाचा : 

Chhatrapati Shivaji Maharaj : 'कंत्राटदारांच्या जीवावर सरकार बनत असेल, महाराजांचा पुतळा नाही'; मराठी लेखकाचा तीव्र शब्दांत संताप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Dhananjay Munde: भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन: धनंजय मुंडे
माझ्या पाठिशी भगवानगड आणि न्यायाचार्यांची ताकद उभी राहिलेय, माझा आत्मविश्वास वाढलाय: धनंजय मुंडे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सNarhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरणUday Samant : मराठी भाषेला त्रास देणाऱ्यांना... उदय सामंतांचं भाषण Pune Vishwa Marathi SammelanGunaratna Sadavarte On Suresh Dhas भाजप नेत्यांनी सुरेश धसांना समज द्यावा, त्यांच्यावर हक्कभंग आणावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Dhananjay Munde: भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन: धनंजय मुंडे
माझ्या पाठिशी भगवानगड आणि न्यायाचार्यांची ताकद उभी राहिलेय, माझा आत्मविश्वास वाढलाय: धनंजय मुंडे
Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Bhagwangad Namdev Shastri: ज्यांनी संतोष देशमुखांना मारलं, त्यांची मानसिकताही विचारात घ्यायला हवी, धनंजय मुंडेंची पाठराखण करताना नामदेवशास्त्री काय म्हणाले?
ज्यांनी संतोष देशमुखांना मारलं, त्यांची मानसिकताही विचारात घ्यायला हवी, धनंजय मुंडेंची पाठराखण करताना नामदेवशास्त्री काय म्हणाले?
Embed widget