Utkarsh Shinde: “देवाला आवडणारा आवाज”; उत्कर्ष शिंदेनं शेअर केला प्रल्हाद शिंदेंचा खास व्हिडीओ
Utkarsh Shinde: नुकताच उत्कर्ष एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला उत्कर्षनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
![Utkarsh Shinde: “देवाला आवडणारा आवाज”; उत्कर्ष शिंदेनं शेअर केला प्रल्हाद शिंदेंचा खास व्हिडीओ utkarsh shinde share video of grandfather prahlad shinde on social media Utkarsh Shinde: “देवाला आवडणारा आवाज”; उत्कर्ष शिंदेनं शेअर केला प्रल्हाद शिंदेंचा खास व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/21/822b4dc62c3b197a4c6ae2e305cf2c991695289561727259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Utkarsh Shinde: अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) हा सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. तो वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतो. नुकताच उत्कर्ष एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला उत्कर्षनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
उत्कर्ष शिंदेने त्याच्या आजोबांचा म्हणजेच प्रल्हाद शिंदे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते तूच सुखकर्ता तूच दुःख हरता हे गाणं गाताना दिसत आहे. प्रल्हाद शिंदे यांची ही आठवण सोशल मीडियावर शेअर करुन उत्कर्ष शिंदेने कॅप्शनमध्ये लिहिले,"देवाला आवडणारा आवाज”, ते तूच सुखकर्ता तूच दुःख हरता. आज सकाळीच हे गाणं ऐकूण झालं. गणपतीचा माहोल बनवायचा म्हटलं की हे गाणं तर झालच पाहीजे. कैकदा भेटणारे चाहते या गाण्याच्या आठवणी सांगतात. आमच्या लहानपणी आमच्या कोकणात घरा समोर झाडांच्या बागांच्या आवतीभोवती रान घनदाट झाडी आणि मग दूरवर दुसर घर.पण यात सुधा सण आले की सर्वांना एकत्रित करणारा एक आवाज कानी पडायचा. ते तूच सुखकर्ता तूच दुःख हरत ,अता तरी देवा मला पावशील का? ते ऐका सत्यनारायणाची कथा. पिढ्यानपिढ्या जिवंत असलेला हा आवाज आज ही यूट्यूब,इन्स्टा रिल्स मधून युवा पिढीला भुरळ घालतोय. प्रल्हाद शिंदेंच्या गाठीशी पैसा अवॉर्ड जरी कमी आले असले तरीही सर्व जाती आणि धर्मातील प्रेक्षाकांचं प्रेम हे सर्वात जास्त लाभलेले त्यांच्यासारखे बोटावर मोजण्या इतकेच असतील. या गळ्याने शास्त्रीय बाज जरी जपला नसला तरी वंशपरंपरागत गळ्यातून येणारा करेक्ट सूर मात्र त्यांनी सांभाळला होता. मानवी मनाला आध्यात्माकडे खेचून आणणार हा आवाज .घरातले सासू सुनेचे वाद असो किंवा नात्यांची गंमत सांगणारे गाणे असो .लोकगीतांचे सामने ते रेकॉर्ड ब्रेक करणारी वैविध्यपूर्ण अशी गाणी. त्यांच्याबरोबर काम केलेली मंडळी सांगतात वरच्या पट्टीत गाताना जिथे इतर गायकांचा श्वास आवाज संपायचा तिथे प्रल्हाद शिंदेंची तान सुरु व्हायची.लहानग्यांपासुन ते वृद्धनाही अपलासा वाटणारा हा आवाज. मेळ्यात,चौकात,बजरात,भजनात,पारायणात, सप्ताहात ते घरातील देवघरात जाऊन पोहोचलेला प्रल्हाद शिंदेंचा हा आवाज जो अजरामर होता आहे आणि राहिल"
View this post on Instagram
प्रल्हाद शिंदे यांच्या नाम तुझे घेई देवा,चंद्र भागेच्य तिरी, जैसे ज्याचे कर्म या भक्तीगीतांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)