
Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिका उत्कंठावर्धक वळणावर; प्राचीमुळे अप्पूच्या आयुष्यात येणार नवं संकट
Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेच्या आगामी भागात प्राचीमुळे अप्पू अडचणीत आल्याचं दिसणार आहे.

Thipkyanchi Rangoli Marathi Serial Latest Update : 'ठिपक्यांची रांगोळी' (Thipkyanchi Rangoli) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत सध्या अप्पू आणि प्राचीची परीक्षा सुरू असल्याचं दिसत आहे. आता या मालिकेच्या आगामी भागात अप्पूला परीक्षा न देता यावी यासाठी प्राची खास प्लॅन बनवणार आहे.
'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार?
'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सुमी-कुकी आणि अपर्णा अमेयबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. तर दुसरीकडे अमेय घरी असल्यामुळे मानसी खूप दिवसांनी आनंदी दिसणार आहे. पण तरीही 'त्या' रात्री अमेय नक्की कुठे होता याचा संशय अपर्णा घेत आहेत. तर कुकी आणि सुमी मात्र अमेयवर विश्वास दाखवत आहेत. अमेय आणि मानसीमधल्या मतभेदांना अप्पू आणि शशांक जबाबदार असल्याचं अपर्णाचं मत आहे.
View this post on Instagram
घरातल्या वाईट परिस्थितीला अपर्णाने अप्पू-शशांकला धरले जबाबदार
'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात शशांकने अमेयला जाब विचारला आहे. अर्थात शशांक अमेयबद्दल काळजीपोटी बोलला आहे. आता मालिकेच्या आगामी भागात अपर्णा शशांक अप्पूच्या तालावर नाचायला लागला आहे. अप्पूने प्राचीचा साखरपुडा मोडला असं म्हणताना दिसेल. त्यावर कुकी अपर्णाला सांगतो की,आपल्या मुलीची निवड चुकली आहे. पण घरातल्या वाईट परिस्थितीला अपर्णाने अप्पू-शशांकला जबाबदार धरलं आहे.
प्राचीमुळे अप्पूच्या आयुष्यात येणार नवं संकट
दुसरीकडे अप्पू-प्राचीला बोलते की, मी परीक्षा दिली असली तरी मला खूप भीती वाटत आहे. यावर प्राची मनात म्हणते,"परीक्षेला गेलीस तर पेपर चांगला जाईन ना". त्यानंतर प्राची अप्पूला बोलते, मी वर्षाच्या पहिल्या दिवसापासून अभ्यास करते. त्यामुळे मला कधीच भीती वाटत नाही. त्यानंतर एका रात्री अभ्यास कसा करायचा हे प्राची अप्पूला सांगते". त्यानंतर अप्पू झोपायला निघून जाते. दरम्यान प्राची म्हणते की,"अपूर्वा तुला परीक्षा टाळण्यासाठी काहीही करायची गरज नाही. उद्या तुला परीक्षा देता येणार नाही याची सोय मी आधीच केली आहे".
संबंधित बातम्या
Sukh Mhanje Nakki Kay Asta: लक्ष्मीवर चुकीचे संस्कार होऊ नयेत म्हणून काय पाऊल उचलेल जयदीप? 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेच्या नव्या प्रोमोनं वेधलं लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
