एक्स्प्लोर

Splitsvilla 7 Fame Mayank Pawar Passes Away: 7 वेळचा 'मिस्टर इंडिया', सनी लिओनीला रडवणारा मराठमोळा फिटनेस मॉडल; कोण आहे 'स्प्लिट्सव्हिला 7' फेम मयंक पवार?

Splitsvilla 7 Fame Mayank Pawar Passes Away: मयंक पवारच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे चाहते आणखी हैराण झालेले आहेत.

Splitsvilla 7 Fame Mayank Pawar Passes Away: काही रिअॅलिटी शोमधले (Reality Show) स्पर्धक प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करतात. एवढं की, कॅमेरे बंद झाल्यानंतरही प्रेक्षकांच्या हृदयात घर करतात. त्यापैकीच एक फिटनेस मॉडल मयंक पवार (Fitness Model Mayank Pawar). वयाच्या 37व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला. मयंकच्या निधनाच्या वृत्तानं मनोरंजन विश्वासोबतच फिटनेस वर्ल्डही हादरलं आहे. फिटनेस फ्रिक असलेल्या मयंक पवारनं (Mayank Pawar) तब्बल 7 वेळा 'मिस्टर इंडिया' हा खिताब पटकावलेला. तर, त्यासोबतच 'मिस्टर एशिया' हा बहुमानही मिळवलेला. अनेकांचा रोल मॉडल असलेल्या मराठमोळ्या मयंक पवारच्या अचानक जाण्यानं चाहत्यांना पुरता धक्का बसला आहे. मयंकच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन त्याच्या निधनाची माहिती देण्यात आलीय. 

मयंक पवारच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे चाहते आणखी हैराण झालेले आहेत. दरम्यान, 1 जानेवारी 2026 ला मयंकनं आपला वाढदिवस साजरा केलेला. तसेच, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन पॉझिटिव्ह मेसेजही दिलेला. सध्या मयंकच्या इन्स्टाग्रामवरुन करण्यात आलेली त्याच्या निधनाची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्यात त्याला केवळ एक सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून नव्हे तर एक भाऊ, चॅम्पियन, मार्गदर्शक आणि प्रेरणा म्हणून वर्णन केलं आहे. पोस्टमध्ये लिहिलंय की, "एक भाऊ, एक चॅम्पियन, एक मार्गदर्शक आणि अनेकांसाठी प्रेरणा... मयंक पवार नेहमीच आपल्या हृदयात जिवंत राहतील. कृपया आमच्या प्रार्थना आणि श्रद्धांजलीमध्ये सामील व्हा... ओम शांती..." 

मयंक पवार 'स्प्लिट्सव्हिला 7'मध्येही सहभागी झालेला. त्यानं तिथे सर्वांना आपलंस करुन घेतलेलं. ज्यावेळी 'स्प्लिट्सव्हिला 7'मधून मयंक बाहेर पडला, तेव्हा सनी लिओनी रडलेली. नेमकं तेव्हा काय घडलेलं, जाणून घेऊयात सविस्तर...

फिटनेस मॉडलनं सनी लिओनीला रडवलेलं, नेमकं काय घडलेलं? 

एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला सीझन 7 मध्ये सहभागी झाल्यानंतर मराठमोळा मयंक पवार घराघरात पोहोचलेला. त्याची सुंदर शरीरयष्टी, सरळ पण थेट बोलणं आणि मैत्रीपूर्ण स्वभाव यामुळे तो शोच्या सर्वात आवडत्या स्पर्धकांपैकी एक बनला. प्रेक्षकांनी त्याची प्रामाणिकता आणि खिलाडूवृत्तीचं खूप कौतुक केलेलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mayank Pawar™ (@pawarmayank)

शो दरम्यान, त्यानं होस्ट सनी लिओन आणि निखिल चिनप्पा यांचीही मनं जिंकलेली. त्याचं शोमधलं एलिमिनेशन हे त्या सीझनमधील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक होतं. सनी लिओनी खूपच भावुक झालेली आणि निखिल चिनप्पानं त्याला कडकडून मिठी मारून निरोप दिलेला. एका टास्क दरम्यान दुखापत झाली असूनही, मयंकनं खंबीर राहून पूर्ण जोशानं कामगिरी केली. त्याचे कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे त्याला चाहत्यांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळालंय.

रिअॅलिटी शोच्या पलीकडे, मयंक फिटनेस जगतातही एक प्रमुख व्यक्ती होता. त्यानं सात वेळा मिस्टर इंडियाचा किताब जिंकला होता. एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर म्हणून, त्यानं अनेकांना शिस्त, आरोग्य आणि मानसिक ताकद राखण्यासाठी प्रेरित केलंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Splitsvilla 7 Contestant Mayank Pawar Dies: 'स्प्लिट्सव्हिला 7' फेम मयंक पवार काळाच्या पडद्याआड, अकाली एग्झीटनं चाहत्यांना धक्का; सात वेळा जिंकलेला 'मिस्टर इंडिया'चा किताब

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
Bigg Boss Marathi 6: शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
Dhurandhar 2: धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार
धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget