एक्स्प्लोर

Prasikaofficial Instagram Account Now Active: इन्फ्लुएंसर कपल 'प्रसिका'ला दिलासा; सस्पेंड झालेल्या चार अकाउंट्सपैकी एक अकाउंट सुरू; इंस्टाग्रामनं माफीही मागितली

Prasikaofficial Instagram Account Now Active: दीपिकानं स्वतः इंस्टाग्रामवर अधिकृत मेलचा स्क्रीनशॉट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली. या मेलमध्ये इंस्टाग्रामकडून अकाऊंटची तपासणी करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

Prasikaofficial Instagram Account Now Active: सोशल मीडियावरचं (Social Media) प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर कपल (Content Creator Couple) प्रसाद वेदपाठक (Prasad Vedpathak) आणि दीपिका वेदपाठक (Deepika Vedpathak) यांचे तब्बल चार इन्स्टाग्राम अकाउंट्स काही दिवसांपूर्वी अचानक मेटाकडून सस्पेंड करण्यात आलेले. 'प्रसिका' (Prasika) म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या इन्फ्लुएंसर कपलसोबतच त्यांच्या फॉलोअर्सनाही हा मोठा धक्का होता. एकाच वेळी लाखो फॉलोअर्स असलेले इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि युट्युबवरील अकाउंट्स बंद झाल्याचं स्वतः कपलनं सांगितलं होतं. पण, आता प्रसिकाच्या फॉलोअर्ससाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल दहा दिवसांनी prasika_official हे त्यांचं मुख्य इन्स्टाग्राम अकाऊंट पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.

दीपिकानं स्वतः इंस्टाग्रामवर अधिकृत मेलचा स्क्रीनशॉट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली. या मेलमध्ये इंस्टाग्रामकडून अकाऊंटची तपासणी करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. अकाउंटचा अ‍ॅक्टिव्हिटी वापर अटींनुसार योग्य असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच, झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे. दरम्यान, मेटानं प्रसिकाचे चार अकाउंट्स सस्पेंड केलेले. आता, त्यातलं एकच अकाउंट अॅक्टिव्ह करण्यात आलं आहे. तर, उर्वरित तीन अकाऊंट्स अजूनही डिअॅक्टिव्ह आहेत, असं प्रसाद आणि दीपिकानं सांगितलं आहे. त्यामुळे प्रसिकाचं पूर्ण टेशन्स संपलेलं नसलं तरीसुद्धा काहीसा दिलासा मात्र नक्कीच मिळाला आहे. 

Prasikaofficial Instagram Account Now Active: इन्फ्लुएंसर कपल 'प्रसिका'ला दिलासा; सस्पेंड झालेल्या चार अकाउंट्सपैकी एक अकाउंट सुरू; इंस्टाग्रामनं माफीही मागितली

अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर प्रसाद वेदपाठकनं दिलेली माहिती

प्रसाद वेदपाठकनं त्याच्या अधिकृत अकाउंटवरुन व्हिडीओ पोस्ट करत याबाबत संपूर्ण माहिती दिली. व्हिडीओमध्ये प्रसाद वेदपाठक म्हणतोय की,  "गेल्या 10 वर्षांपासून आम्ही प्रामाणिकपणे कंटेट तयार करतोय.   आम्ही कधीही कम्युनिटी गाईडलाईन्सचं उल्लंघन केलेलं नाही.  सर्व गाईडलाईन्स फॉलो करुन सुद्धा आमची सर्व अकाउंट्स अचानक सस्पेंड करण्यात आली आहेत.  अकाउंट्स सस्पेंड करण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही...", असं प्रसाद वेदपाठक म्हणालेला. दरम्यान, त्यानं संबंधित प्लॅटफॉर्म्सना या प्रकरणाची तातडीनं दखल घेण्याची विनंती केली होती. 

View this post on Instagram
 
A post shared by Deepika Vedpathak (Prasika ®) (@prasika_official)

अकाउंट सस्पेंड केल्यानंतर प्रसिकाची मेटा ऑफिसमध्ये धाव

अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर प्रसाद वेदपाठक आणि दीपिका वेदपाठक यांनी एक व्हिडीओ शेअर करत इंस्टाग्राम आणि मेटाकडे यामागील कारण स्पष्ट करण्याची मागणी केली होती. त्यांनी अकाऊंट पुन्हा सुरू करण्यासाठी सार्वजनिकरित्या विनंतीही केली होती. पण, अनेक दिवस कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं दोघांनी मेटाच्या मुंबईतील बीकेसी कार्यालयात धाव घेतली होती. पण, तिथेही त्यांच्या पदरी निराशा आली. कारण बीकेसी येथील मेटा ऑफिस सेल्स ऑफिस असल्याचं त्यांना समजलं आणि तिथे त्यांना रिसेप्शनपर्यंत जाण्याची परवानगी मिळाली, पण तिथे कुणाशीच संवाद साधू शकले नाहीत. अखेर आता चारपैकी एक अकाउंट सुरू झालं आहे. त्यामुळे थोडासा का होईना दिलासा, प्रसिकाला मिळाला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Wandering Minds India Sushil Ahire Kinjal Damani Emotional Post: 'आम्ही आमचं बाळ गमावलंय...'; मराठमोळ्या इन्फ्लुएन्सर कपलवर कोसळला दुःखाचा डोंगर

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?
Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget