The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' च्या नव्या सीझनचा प्रोमो व्हायरल; 10 सप्टेंबरपासून शो येणार प्रेक्षकांच्या भेटीस
'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) च्या नव्या सीझनमध्ये जुन्या सीझनमधील काही कलाकार आहेत, तर काही नव्या कलाकारांची एन्ट्री देखील या सीझनमध्ये होणार आहे.
The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. बॉलिवूडमधील अनेक कलाकार या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात. शोमधील कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. आता या कार्यक्रमाचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नव्या सीझनमध्ये जुन्या सीझनमधील काही कलाकार आहेत, तर काही नव्या कलाकारांची एन्ट्री देखील या सीझनमध्ये होणार आहे.
नव्या सीझनमधील कलाकार
'द कपिल शर्मा शो' च्या नव्या सीझनमध्ये सुमोना चक्रवर्ती, कीकू शारदा आणि चंदन प्रभाकर हे जुन्या सिझनमधील कलाकार असणार आहेत. तर सिद्धार्थ सागर, सृष्टी रोडे गौरव दुबे, इश्तियाक खान आणि श्रीकांत मस्की ही नवी कास्ट देखील या शोमध्ये सहभागी होणार आहे. नव्या सीझनच्या प्रोमोमध्ये अर्चना पुरण सिंह देखील दिसत आहे.
10 सप्टेंबरपासून हा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर कपिल पुन्हा एकदा त्याच्या संपूर्ण टीमसह सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता प्रेक्षक या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. कपिलनं हा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी कपिलला या नव्या सीझनसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
23 एप्रिल 2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली. अभिनेता सलमान खान या शोचा निर्माता आहे. कपिल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: