एक्स्प्लोर

Tejashri Pradhan: 'काहीही हा श्री' डायलॉग ते युनिक मंगळसूत्र; होणार सून मी या घरची मालिकेतील जान्हवी 'या' कारणामुळे होती चर्चेत

होणार सून मी ह्या घरची (Honaar Soon Mee Hyaa Gharchi) या मालिकेमध्ये तेजश्रीनं  (Tejashri Pradhan) जान्हवी ही भूमिका साकारली होती.

Tejashri Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ही  लवकरच एका नव्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तेजश्रीनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण होणार सून मी ह्या घरची (Honaar Soon Mee Hyaa Gharchi) या मालिकेमुळे तेजश्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तेजश्रीनं जान्हवी ही भूमिका साकारली होती. या मालिकेमधील तेजश्रीच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. जान्हवी या भूमिकेचे डायलॉग्स आणि बोलण्याची, हसण्याची स्टाईल या सगळ्यांनीच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. जान्हवीच्या मंगळसूत्राच्या डिझाइननं देखील अनेकांचे लक्ष वेधले होते. जाणून घेऊयात तेजश्रीनं साकारलेल्या जान्हवी या भूमिकेबद्दल

'काहीही हा श्री' डायलॉग होता चर्चेत

होणार सून मी ह्या घरची  या मालिकेमधील श्री ही भूमिका अभिनेता शशांक केतकरनं साकारली. होणार सून मी ह्या घरची या मालिकेमध्ये जान्हवीचा  'काहीही हा श्री' हा डायलॉग फेमस झाला होता. तेजश्रीच्या या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले.

जान्हवी मंगळसूत्र 

तेजश्रीनं साकारलेल्या जान्हवी या भूमिकेचं मंगळसूत्र हे लोकप्रिय ठरलं. या तीन पदरी मंगळसूत्रानं त्यावेळी अनेक महिलांचे लक्ष वेधले होते. अनेक महिलांनी जान्हवीच्या मंगळसूत्राच्या डिझाइसारखं तीन पदरी मंगळसूत्र त्यावेळी घेतले होते. आजही अनेक महिला जान्हवीच्या मंगळसूत्रासारखी डिझाइन असणारं मंगळसूत्र घालतात. 

जान्हवी आणि श्री यांच्या जोडीला मिळाली प्रेक्षकांची पसंती 

होणार सून मी ह्या घरची या मालिकेतील जान्हवी आणि श्री यांच्या जोडीला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या दोघांची मालिकेतील केमिस्ट्री प्रेक्षकांची मनं जिंकत होती.

तेजश्रीनं तिच्या नव्या मालिकेबद्दल एक खास व्हिडीओ शेअर करुन माहिती दिली. या व्हिडीओमध्ये तेजश्री म्हणते, 'आपली मराठी परंपरा मराठी प्रवाह", बरोबर ओळखलं, मी येतील आपल्या लाडक्या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून तुमच्या भेटीसाठी. मालिकेचं नाव, तारीख, वेळ ही सगळी उत्सुकता पूर्ण होणर आहे, आमच्या नव्या प्रोमोमधून.' तेजश्रीच्या या आगामी मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Tejashri Pradhan: तेजश्री प्रधान नव्या मालिकेमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस; अभिनेत्रीनं खास व्हिडीओ शेअर करुन दिली माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget