एक्स्प्लोर

Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO

Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘झी मराठी’वर ‘लक्ष्मी निवास’ मालिका गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या वेळेत दाखवली जातेय. आता मालिकेच्या कथानकात मोठे बदल करण्यात येणार आहे.

Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘झी मराठी’वरच्या (Zee Marathi) गाजलेल्या मालिकेत आता सात वर्षांचा लीप येणार आहे. तर, मालिकेचं कथानक संपूर्ण बदलून जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. अनेकांना मालिकेत अचानक भयानक घेण्यात येत असलेला सात वर्षांचा लीप पटेनासा झालाय. तर, मालिकेतल्या कथानकाच अचानक झालेले बदल अनेक प्रेक्षकांना मान्य नाहीत. मालिकेत भला मोठा लीप घेतल्यानंतर मालिकेतील मुख्य अभिनेते तुषार दळवी एक्झिट घेणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक अजून निराश झाले आहेत. अनेकांनी तर सोशल मीडियावर वाहिनीला जाब विचारायला सुरुवात केली आहे. तर, अनेकांनी ‘लक्ष्मी निवास’मधील (Lakshmi Nivas Serial) निवासच नसेल, तर काय पाहायचं? असा उलट प्रश्नच विचारला आहे. 

‘झी मराठी’वर ‘लक्ष्मी निवास’ मालिका (Lakshmi Nivas Zee Marathi Serial) गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या वेळेत दाखवली जातेय. आता मालिकेच्या कथानकात मोठे बदल करण्यात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे,  भावना-सिद्धू यांच्या नात्यात दुरावा आलाय, तर जान्हवीनं आपाल नव्यानं संसार थाटलाय. तिनं विश्वासोबत लग्न केलं असून दोघांना गोंडस मुलगाही दाखवण्यात आलाय. पण, सर्वात धक्कादायक बदल म्हणजे, मालिकेचे मुख्य अभिनेते आता दिसणार नाहीत. त्यांची एक्झिट झाली असून आता ते कथानकाचा भाग नसणार आहेत. 

‘झी मराठी’कडून प्रोमो शेअर (Zee Marathi Lakshmi Nivas Serial Promo)

‘झी मराठी’नं ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये सगळंच बदललेलं पहायला मिळतंय. प्रोमोमध्ये दळवी कुटुंबाची परिस्थिती आता पूर्णपणे बदलली असून लक्ष्मी यशस्वी उद्योजिका झाली आहे. तर, मुख्य अभिनेते श्रीनिवास यांचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांची स्वप्न आता लक्ष्मी मुलांच्या साथीनं पूर्ण करताना दिसणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या प्रोमोमध्ये श्रीनिवास हे पात्र आता कथानकाचा भाग नसणार आहे. त्यामुळे मालिकेतून अभिनेते तुषार दळवी यांची एक्झिट झाली आहे. तर, दुसरीकडे जयंत जेलमध्ये गेल्यानंतर जान्हवी आपला नवा संसार थाटते आणि विश्वासोबत लग्न करते. दोघांना एक मुलगा आहे. पण, आता दळवी कुटुंबाच्या आयुष्यात वादळ येणार आहे. 7 वर्षांचा कारावास भोगल्यानंतर जयंत बदला घेण्यासाठी परत येणार आहे. 

तर, भावना आणि सिद्धू यांच्यात दुरावा येतो आणि यामुळेच भावना आणि लक्ष्मी यांच्या नात्यातलं अंतर वाढतं. सिद्धूसोबतच्या नात्यातल्या वाढत्या तणावाला भावना लक्ष्मीला जबाबदार मानते. 

दरम्यान, आता लक्ष्मी कुटुंबाची विस्कटलेली घडी कशी बसवणार? आणि सुडानं पेटलेल्या जयंतपासून दळवी कुटुंबाचं रक्षण कसं करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget