Star Pravah Dhumdhadaka 2022 : 'स्टार प्रवाह धुमधडाका 2022’ ; कलाकारांच्या परफॉर्मन्सने रंगणार नवीन वर्षाची पार्टी
श्रुती मराठे (Shruti Marathe ), मृण्मयी देशपांडे(Mrunmayee Deshpande) , संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude), मानसी नाईक (Manasi Naik) यांच्या दिलखेचक अदाही या कार्यक्रमातून पाहायला मिळतील.
Star Pravah Dhumdhadaka 2022 : धमाल गाणी, हटके परफॉर्मन्स, जोशभरा माहोल आणि विनोदाचा खमंग तडका जर तुम्हाला तुमच्या लाडक्या कलाकारांसोबत अनुभवता आला तर? सेलिब्रेशनची रंगत द्विगुणीत होणार हे वेगळं सांगायला नको. ‘स्टार प्रवाह धुमधडाका 2022’ या नववर्ष विशेष कार्यक्रमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची धमाल मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. सरत्या वर्षाला हसरा निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाहचे कलाकार सज्ज आहेत. तुमच्या लाडक्या कलाकारांचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरबसल्या सहकुटुंब अनुभवता येईल. स्टार प्रवाहच्या कलाकारांसोबतच श्रुती मराठे (Shruti Marathe ), मृण्मयी देशपांडे(Mrunmayee Deshpande) , संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude), मानसी नाईक (Manasi Naik) यांच्या दिलखेचक अदाही या कार्यक्रमातून पाहायला मिळतील.
View this post on Instagram
आनंद शिंदेंची गाणी ऐकली की पाय आपसुकच थिरकायला लागतात. 'स्टार प्रवाह धुमधडाका 2022' हा कार्यक्रमही याला अपवाद ठरला नाही. आनंद शिंदेंच्या गाण्यावर स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार मनसोक्त नाचला. अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे यांच्या अफलातून जुगलबंदीने कार्यक्रमाला चार चांद लागले. खास बात म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला कोठारे हीने पहिल्यांदाच एकत्र स्टेज शेअर करत एक अनोखा नृत्याविष्कार सादर केला. हटके परफॉर्मन्ससोबतच सिद्धार्थ जाधव आणि सिद्धार्थ चांदेकर दोघांच्या खुमासदार सुत्रसंचलनाने या कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. 2 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता स्टार प्रवाहवर तुम्हाला हा कार्यक्रम पाहता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Tamannaah Bhatia Birthday : सौंदर्यवती तमन्नाचा वाढदिवस; जाणून घ्या तमन्ना भाटियाबाबत खास गोष्टी