एक्स्प्लोर

Govinda Birthday : एकेकाळी दोन वेळच्या खाण्याची भ्रांत, पण आज कोट्यवधींचा मालक; विरारमधील चाळीतील वास्तव्य, सुपरस्टार गोविंदाचा थक्क करणारा प्रवास

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा (Govinda) आज 58 वा वाढदिवस.

Govinda Birthday : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा (Govinda) आज 58 वा वाढदिवस. गोविंदाच्या स्टाईलला आणि त्याच्या नृत्यशैलीला त्याच्या चाहत्यांची नेहमीच पसंती मिळते. गोविंदाचा जन्म 21 डिसेंबर 1963 रोजी मुंबईमध्ये झाला.गोविंदाची आई निर्मला देवी (Nirmala Devi) या अभिनेत्री आणि गायिका होत्या. तर त्याचे वडील अरुण आहूजा (Arun Ahuja) हे अभिनेते होते. जवळपास 30 चित्रपटांमध्ये गोविंदाने हिरोची भूमिका साकारली. 1997 मध्ये एका मुलाखतीत गोविंदाने त्याच्या खडतर प्रवासाबद्दल सांगितले होते. 

जेव्हा गोविंदा विरारच्या चाळीत राहात होता
गोविंदाचे वडील अरुण आहूजा यांनी एक चित्रपट प्रोड्यूस केला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यामुळे गोविंदाच्या संपूर्ण कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. गोविंदाच्या वडीलांने कार्टर रोड येथील त्यांचा बंगला विकला. त्यानंतर ते विरार येथील एका चाळीमध्ये राहायला लागले. बालपणी येणाऱ्या अडचणींबद्दल एका मुलाखतीमध्ये गोविंदाने सांगितले होते. त्यानं सांगितले की, 'मी दुकानात सामान घ्यायला जात होतो तेव्हा दुकानदार मला कित्येक तास दुकाना बाहेर बसायला लावत असे. कारण माझ्याकडे त्या दुकानदाराला देण्यासाठी पैसे नव्हते. मी उधारीवर सामान आणत होतो. एकदा आईने मला दुकानात जाऊन सामान आणायला सांगितले तेव्हा मी आईला नकार दिला. त्यावेळी घरातील परिस्थितीमुळे आई आणि मला अश्रू अनावर झाला होते. ' 

अभिनय क्षेत्रात केले पदार्पण
गोविंदाने 1986 मध्ये इल्जाम या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यानंतर  खुदगर्ज, घर घर की कहानी, जंग बाज, आवारगी, स्वर्ग, शोला और राजा बाबू, कुली नंबर 1, आंटी नंबर 1,  साजन चले ससुराल, हीरो नंबर 1, हसीना मान जाएगी, दीवाना मस्ताना, बड़े मियां छोटे मियां  आणि पार्टनर या चित्रपटांमध्ये गोविंदाने काम केले.
 
View this post on Instagram
 
A post shared by Govinda (@govinda_herono1)

गोविंदाची संपत्ती
रिपोर्टनुसार, गोविंदाकडे एकूण 135 कोटी रूपये इतकी संपत्ती आहे. एका चित्रपटासाठी गोविंदा 5 ते 6 कोटी मानधन घेतो. गोविंदा एकूण तीन बंगल्यांचा मालक आहे. सध्या गोविंदा त्याच्या कुटुंबासोबत ज्या घरात राहतो, त्या घराची किंमत 16 कोटी रूपये आहे. तसेच गोविंदाकडे जवळपास 64 लाख रूपये किंमत असणारी मर्सिडीज बेंज जीएलसी गाडी आहे. तसेच त्याच्याकडे  मर्सिडीज सी220D  ही गाडी देखील आहे. या गाडीची किंमत 43 लाख आहे. 11 मार्च 1987 रोजी गोविंदाने सुनिता मुंजालसोबत लग्न  केले. सुनिता आणि गोविंदा यांनी टीना आणि  यशवर्धन ही दोन मुलं आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Kambli : विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा; महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा; महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal on Devendra Fadnavis : 10 दिवसांमध्ये तोडगा काढणार, फडणवीसांचं आश्वासनCyber Crime : सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा, 'Digital Arrest'च्या जाळ्यात ओढून कोट्यवधींची लूटDevendra Fadnavis on Chhagan Bhujbal : 'दादांचा भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा विचार'Top 50 : टॉप 50 : राज्यातील 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 23 डिसेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Kambli : विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
विनोद कांबळी रुग्णालयात दाखल; प्रकृती बरी नसल्याचे व्हिडिओ पाहताच जिंदादिल डॉक्टर उपचारासाठी सरसावला!
Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
सातारा जिल्ह्यात तब्बल चार वजनदार मंत्री, पालकमंत्रीपद कोणाला मिळावं? उदयनराजेंनी नाव सांगितलं!
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्‍यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा; महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, धनंजय मुंडेंना सातपुडा; महायुतीच्या मंत्र्‍यांना मुंबईतील बंगल्यांच्या चाव्या, कोणाला कोणता?
Anjali Damania on Dhananjay Munde : धनंजय मुंडे, कोण आहे हा? कार्यकर्ता आहे तुमचा? असे कार्यकर्ते लागतात तुम्हाला? अंजली दमानियांनी आणखी एक बंदुकधारी समोर आणला!
धनंजय मुंडे, कोण आहे हा? कार्यकर्ता आहे तुमचा? असे कार्यकर्ते लागतात तुम्हाला? अंजली दमानियांनी आणखी एक बंदुकधारी समोर आणला!
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
भुजबळांसाठी त्यांचा मुलगा अन् पुतण्या इतकेच ओबीसी, जातीयवादाचे ढोंग मला अजिबात मान्य नाही; माणिकराव कोकाटेंचा सडकून प्रहार
Sunny Leone : सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
वाल्मिक कराडवर फक्त परळीत 10 वेळा FIR झाले, गंभीर गुन्हे असलेला माणूस, धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी बरोबर डायरेक्टर? अंजली दमानियांनी कुंडलीच मांडली!
Embed widget