(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Thakare : 'बिग बॉस मराठी'चा विजेता शिव ठाकरे आता गाजवणार भाईजानचा 'बिग बॉस'
Salman Khan : 'बिग बॉस मराठी' फेम शिव ठाकरे हिंदी बिग बॉसमध्ये दिसणार आहे. 1 ऑक्टोबरला या कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे.
Bigg Boss 16 : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. भाईजानचा बिग बॉस सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. युट्यूबर अब्दु राजिकनंतर (Abdu Razik) आता आणखी एक नाव समोर आलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता अर्थात मराठमोळा शिव ठाकरे (Shiv Thakare) 'बिग बॉस 16' या प्रेक्षकांच्या लाडक्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
'बिग बॉस 16'साठी निर्मात्यांनी शिव ठाकरेला विचारणा केली आहे. अमरावतीच्या शिवने एमटीव्हीच्या 'रोडीज' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मनोरंजनसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर 2019 साली महेश मांजरेकरांच्या बिग बॉसमध्ये म्हणजेच 'बिग बॉस मराठी'मध्ये शिव ठाकरे सहभागी झाला. या पर्वात शिव ठाकरे आणि वीणा जगतापची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
'बिग बॉस 16'मध्ये कोणते स्पर्धक असतील?
'बिग बॉस 16'मध्ये अब्दु राजिक, शिव ठाकरेसह टीना दत्ता, श्रीजिता डे, शालीन भनोट, गौरी नागोरी, गौतम विग आणि साजिद खान हे स्पर्धक सहभाही होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप निर्मात्यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या सोशल मीडियावर 'बिग बॉस 16'मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार याची चर्चा सुरू झाली आहे.
1 ऑक्टोबरला होणार प्रीमियर
'बिग बॉस'च्या नव्या प्रोमोमध्ये सुपरस्टार सलमान खानला फिल्मी अंदाज पाहायला मिळत आहे. भाईजानचा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. यंदाच्या पर्वात काही नियम बदलण्यात आले आहेत. त्यामुळे 'बिग बॉस 16'ची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ दिसून येत आहे. 1 ऑक्टोबरला 'बिग बॉस 16'चा ग्रॅंड प्रीमियर होणार आहे.
'छोटी सरदारनी' या मालिकेमध्ये ‘मेहेर’ची भूमिका साकारून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री निम्रत कौर अहलुवालिया आता ‘बिग बॉस 16’च्या घराचा भाग बनणार आहे. या शोसाठी अभिनेत्रीची निवड करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. निर्मात्यांनी तिच्याशी संपर्क साधला असून, तिने देखील होकार दिला असल्याचा दावा केला जात आहे. मालिकेतून तिने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता ती बिग बॉसमध्ये आपला जलवा दाखवणार आहे.
संबंधित बातम्या