Bigg Boss 16 : युट्यूबर अब्दु राजिक होणार भाईजानच्या बिग बॉसमध्ये सहभागी; व्हिडीओ व्हायरल
Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' या वादग्रस्त कार्यक्रमात युट्यबूर अब्दु राजिक सहभागी होणार आहे.
Bigg Boss 16 : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. येत्या 1 ऑक्टोबरला भाईजानचा 'बिग बॉस' सुरू होणार आहे. 'बिग बॉस' हा कार्यक्रम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अशातच या पर्वातील पहिल्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. युट्यूबर अब्दु राजिक (Abdu Razik) या पर्वात सहभागी होणार आहे.
'बिग बॉस 16'चे अनेक अपडेट्स समोर येत आहेत. सध्या सोशल मीडियावर 'बिग बॉस 16'ची चर्चा सुरू आहे. नव्या पर्वाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. आता बिग बॉसच्या घरात अब्दु काय धिंगाणा घालणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. अब्दुने सलमान खानसोबत 'कभी भाई कभी जान' या सिनेमात काम केलं आहे.
View this post on Instagram
'बिग बॉस 16'बद्दल अब्दु म्हणाला,"बिग बॉस'च्या घरात जाण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. मला नक्कीच मदत करा". याआधीदेखील 'बिग बॉस'च्या नव्या पर्वातील दोन सदस्यांची नावं समोर आली होती. यात 'इमली' फेम अभिनेत्री सुम्बुल तौकीर (Sumbal Touqeer Khan) आणि अभिनेता गौतम विज सिंह (Gautam Vij Singh) यांचा समावेश आहे.
'बिग बॉस'च्या नव्या प्रोमोमध्ये सुपरस्टार सलमान खानला फिल्मी अंदाज पाहायला मिळत आहे. भाईजानचा नवा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. यंदाच्या पर्वात काही नियम बदलण्यात आले आहेत. त्यामुळे 'बिग बॉस 16'ची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ दिसून येत आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss 16 : भाईजानच्या बिग बॉसमध्ये प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; ताजिकिस्तानचे सेलिब्रिटी होणार सहभागी?
Bigg Boss 16 : सलमान खानच्या ‘बिग बॉस 16’ची छोट्या पडद्यावर हवा! यंदाच्या पर्वात सहभागी होणाऱ्यांमध्ये ‘या’ नावांची चर्चा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)