Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेत लगीनघाई! दीपा-कार्तिक पुन्हा अडकणार लग्नबंधनात
Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' या मालिकेत आता लगीनघाईला सुरुवात होणार आहे.
Rang Maza Vegla Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजही ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. आता या मालिकेत लगीनघाईला सुरुवात झाली आहे. कार्तिक आणि दीपा पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत.
'रंग माझा वेगळा' या मालिकेत सतत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक दीपा आणि कार्तिकच्या लग्नसोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या मालिकेतील चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपापसातले हेवेदावे विसरुन कार्तिक आणि दीपा पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहेत.
कार्तिक-दीपाचा थाटात पार पडणार विवाहसोहळा
काही गैरसमज आणि दुराव्यामुळे दीपा-कार्तिकने त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण गमावले होते. त्यांच्या दोन्ही मुली वेगवेगळ्या घरांमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या. पण आता त्यांच्यातला गैरसमज दूर झाल्याने त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाचे क्षण येऊ लागले आहेत. कार्तिक-दीपाच्या लग्नसोहळ्याला आता सुरुवात होणार आहे.
कार्तिक-दीपाचा लग्नसोहळा कधी पार पडणार? (When will Karthik-Deepa wedding)
मेहंदी, संगीत आणि लग्न असं सगळं काही साग्रसंगीत पार पडणार आहे. त्यांचा लग्नसोहळ्याचा शाही थाट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे. मालिकेत आलेल्या या महत्त्वाच्या वळणाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. कार्तित-दीपाचा लग्नसोहळा प्रेक्षकांना 5 जानेवारीपासून रात्री आठ वाजता स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.
लग्नसोहळ्याबद्दल आशुतोष गोखले म्हणाला,"कार्तिकला सत्याचा उलगडा झाला आहे. त्यामुळे त्याने दीपाची सर्वांसमक्ष माफी मागून दोन्ही मुलींचा पिता म्हणून स्वीकार केला आहे. पहिल्यांदा सर्वांच्या विरोधात जाऊन कार्तिकने दीपाशी लग्न केलं होतं. यावेळी मात्र सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटाने हे लग्न पार पडणार आहे".
View this post on Instagram
आशुतोष पुढे म्हणाला,"दीपिका आणि कार्तिकीच्या पुढाकारानेच आमचं लग्न पार पडत आहे. या दोघीच आमची लगीनगाठ बांधणार आहेत. त्यामुळे हे लग्न खूपच स्पेशल आहे. संपूर्ण महाराष्ट्र आमच्या मालिकेवर भरभरुन प्रेम करत आहे. तेव्हा दीपा-कार्तिकच्या आयुष्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या वळणाचे साक्षीदार व्हा".
संबंधित बातम्या