Telly Masala : उत्कर्ष शिंदेनं शेअर केला प्रल्हाद शिंदेंचा खास व्हिडीओ ते 'बॉईज 4'मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...
![Telly Masala : उत्कर्ष शिंदेनं शेअर केला प्रल्हाद शिंदेंचा खास व्हिडीओ ते 'बॉईज 4'मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या... marathi movie telly masala marathi serial movies latest update utkarsh shinde share video of prahlad shinde to boyz 4 new poster out Telly Masala : उत्कर्ष शिंदेनं शेअर केला प्रल्हाद शिंदेंचा खास व्हिडीओ ते 'बॉईज 4'मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/21/0a39ccf626889f63b95b27d8bb3054601695296125245259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Utkarsh Shinde: “देवाला आवडणारा आवाज”; उत्कर्ष शिंदेनं शेअर केला प्रल्हाद शिंदेंचा खास व्हिडीओ
Utkarsh Shinde: अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) हा सोशल मीडियावर अॅक्टिव असतो. तो वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतो. नुकताच उत्कर्ष एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला उत्कर्षनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Hemangi Kavi : बाप्पाचं चित्र ते गणेशोत्सवात मिळालेलं पहिलं बक्षीस; हेमांगी कवी म्हणते,"बाप्पा माझा इमेजनरी मित्र"
Hemangi Kavi On Kalavantancha Ganesh : घरोघरी गणपती बाप्पा (Ganapati Bappa) विराजमान झाले आहेत. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींनीदेखील बाप्पाचं जल्लोषात स्वागत केलं आहे. एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) बाप्पासोबतचं तिचं नातं शेअर केलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Boyz 4 : गौरव मोरे ते पार्थ भालेराव; 'बॉईज 4'मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी
Boyz 4 : 'बॉईज 4' (Boyz 4) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. त्यावरुन 'बॉईज 4' या सिनेमात दमदार कलाकारांची फळी दिसणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sankarshan Karhade: "आज विमानाचं केबिन पाहिल्यामुळे मी मात्रं हवेत आहे"; संकर्षणची खास पोस्ट
Sankarshan Karhade: अभिनेता अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) हा सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतो. संकर्षणच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकतेच संकर्षणनं काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो विमानाच्या केबिनमध्ये बसलेला दिसत आहे. संकर्षणनं या फोटोला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Hardeek Joshi Akshaya Deodhar : "जोश्यांचा राजा 2023"; बायकोचा पहिला गणपती म्हणत हार्दिक जोशीने शेअर केले फोटो
Ganeshotsav 2023 : हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरसाठी यंदाचा गणेशोत्सव खूप खास आहे. "जोश्यांचा राजा 2023"; बायकोचा पहिला गणपती म्हणत हार्दिक जोशीने फोटो शेअर केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)