एक्स्प्लोर
Ranveer Allahbadia च्या वैयक्तिक आयुष्यातही वादळ, वादग्रस्त वक्तव्यानंतर गर्लफ्रेंडनंही केलं ब्रेकअप
Ranveer Allahbadia Girlfriend: रणवीर अलाहाबादिया सध्या अश्लील कमेंट्समुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान, आता रणवीरला त्याचं वक्तव्य चांगलंच भोवलं आहे. त्याच्यावर FIR दाखल करण्यात आला आहेच.

Ranveer Allahbadia Controversy
1/9

Ranveer Allahbadia Girlfriend: रणवीर अलाहाबादिया सध्या त्याच्या अश्लील कमेंट्समुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान, आता रणवीरला त्याचं वक्तव्य चांगलंच भोवलं आहे. त्याच्यावर FIR दाखल करण्यात आला आहेच.
2/9

पण आता या प्रकरणाचा परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही पाहायला मिळत आहे. रणवीरच्या प्रेयसीनं त्याच्याशी ब्रेकअप केल्याचं बोललं जात आहे.
3/9

युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया सध्या सोशल मीडियावर खूपच ट्रोल होत आहे. खरं तर, अलिकडेच तो YouTuber समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये दिसला होता. जिथे त्यानं पालकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. दरम्यान, रणवीर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत आहे.
4/9

खरंतर रणवीर अलाहाबादियाची गर्लफ्रेंड निक्की शर्मा हिचं त्याच्याशी ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. काही काळापूर्वी निक्कीचं नाव रणवीरसोबत जोडलं गेलं होतं. निक्की एक अभिनेत्री आहे.
5/9

काही दिवसांपूर्वी रणवीरनं त्याची प्रेयसी निक्की शर्मासोबतच्या व्हेकेशनचे अनेक सुंदर फोटो शेअर केले होते. पण, त्यात निकीचा चेहरा त्यानं हाईड केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता दोघांचं ब्रेकअप झालं आहे.
6/9

इन्स्टंट बॉलिवूड या इंस्टाग्राम पेजनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये रणवीर आणि निक्कीनं एकमेकांना अनफॉलो केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर दोघेही वेगळे झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
7/9

रणवीरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आल्यानंतर निक्कीनं इंस्टाग्रामवर एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिनं लिहिलं आहे की, "योग्य व्यक्ती तुम्हाला प्रेम देऊन शकतात आणि तुम्ही त्यांच्यासाठी मौल्यवान आहेत, याची जाणीव करुन देऊ शकतात. निक्कीच्या पोस्टनंतर कलपचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
8/9

दरम्यान, आतापर्यंत रणवीर किंवा निक्की दोघांनीही या विषयावर कोणतंही उघड वक्तव्य केलेलं नाही. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगलं आहे. रणवीरला त्याच्या 'द रणवीर शो' मधून प्रसिद्धी मिळाली. त्याच्या पॉडकास्ट शोमध्ये आतापर्यंत अनेक मोठे सेलिब्रिटी दिसले आहेत.
9/9

दरम्यान, समय रैनाच्या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे रणवीरला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. त्यानं केलेल्या अश्लील कमेंट्सवर कारवाई करण्याची मागणीही युजर्स करत आहेत.
Published at : 11 Feb 2025 08:44 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बुलढाणा
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
