एक्स्प्लोर

Telly Masala : सुप्रिया पाठारेच्या लेकानं सुरु केलं रेस्टॉरंट ते प्रिया बापट-उमेश कामतच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Friendship Day 2023: दिल दोस्ती दुनियादारी ते फ्रेशर्स; मैत्रीवर आधारित असणाऱ्या 'या' मराठी मालिकांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

Friendship Day 2023: मैत्री म्हणजे विश्वास आणि आपुलकीचं नातं (Friendship Day 2023). मैत्री या नात्यावर अनेक कवींनी कविता केल्या आहेत. तसेच मैत्रीवर आधारित अनेक चित्रपट देखील तुम्ही पाहिले असतील. मैत्री या नात्यावर आधारित असलेल्या छोट्या पडद्यावरील काही मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीस आल्या होत्या. जाणून घेऊयात या मालिकांबद्दल...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sharad Ponkshe : संकटाला स्वीकारा, मार्ग सापडेल; कॅन्सरग्रस्तांना शरद पोंक्षेंचा संदेश

Sharad Ponkshe : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून कॅन्सरवर मात करुन आनंदाने आयुष्य जगणाऱ्या लढवय्यांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला कॅन्सरवर मात केलेली अनेक मंडळी उपस्थित होते. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते आणि कॅन्सरवर मात करणारे शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दरम्यान संकटाला स्वीकारा, मार्ग सापडले असा संदेश शरद पोंक्षे यांनी कॅन्सरग्रस्तांना दिला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Jar Tarchi Goshta : प्रिया बापट-उमेश कामतच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ; पहिल्याच प्रयोगाला झळकली ‘हाऊसफुल्ल’ची पाटी

Jar Tarchi Goshta : सुमारे एका दशकानंतर मराठी इंडस्ट्रीतील ‘क्यूट आणि परफेक्ट कपल’ म्हणजेच प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) रंगभूमीवर एकत्र आले आहेत. या कपलची पडद्यामागील केमिस्ट्री जितकी त्यांच्या चाहत्यांना आवडते तितकीच रंगभूमीवर पाहायलाही आवडते. हीच सुंदर केमिस्ट्री नाट्यरसिकांना आता  नाट्यगृहात पाहायला मिळणार आहे.प्रिया बापट सादर करत असलेल्या ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाचा नुकताच शुभारंभ झाला असून पहिल्याच प्रयोगासाठी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Friendship Day 2023 : 'अशी ही बनवा बनवी' ते 'दुनियादारी'; आज 'फ्रेंडशिप डे'निमित्त तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत 'हे' सिनेमे नक्का पाहा...

Marathi Movies On Friendship Day 2023 : वयाचं, सीमेचं बंधन नसलेलं नातं म्हणजे मैत्रीचं नातं. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभरात मैत्री दिन (Friendship Day 2023) साजरा केला जातो. आज 'फ्रेंडशिप डे'निमित्त तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींसोबत घरातच धमाल मस्ती करत छान वेळ घालवायचा असेल तर मैत्रीवर आधारित, मैत्रीचा खरा अर्थ उलगडणारे भन्नाट मराठी सिनेमे तुमच्या लाडक्या मित्र-मंडळींसोबत नक्की पाहा...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Supriya Pathare: फूड ट्रकनंतर आता सुप्रिया पाठारेच्या लेकानं सुरु केलं रेस्टॉरंट; ओपनिंगला कलाकारांनी लावली हजेरी

Supriya Pathare: मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री सुप्रिया पाठारे  (Supriya Pathare) ही सध्या तिच्या लेकाच्या नव्या व्यावसायामुळे चर्चेत आहे. सुप्रिया पाठारे आणि तिचा लेक मिहीर पाठारे यांनी नवं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. या रेस्टॉरंटचं नाव महाराज फास्ट फूड कॉर्नर असं आहे. सुरुवातील मिहीर पाठारेचा  महाराज नावाचा फूड ट्रक ठाण्यामध्ये होता. आता त्या फूड ट्रकचं रुपांतर रेस्टॉरंटमध्ये झालं आहे. काल या रेस्टॉरंटचं ग्रँड ओपनिंग झालं. या  रेस्टॉरंट ओपनिंग कार्यक्रमाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रियाRohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेटHingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवातTop News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 
विराटनं वानखेडेचं मैदान भाषणानं गाजवलं, कार्यक्रम संपताच मुंबईच्या विमानतळावर पोहोचला, कारण समोर
Pune Crime : पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
पुण्यात थेट डॉक्टर कोयताधारी निघाला; डॉक्टरकडून गुंडांच्या साथीने तरुणावर कोयत्याने वार
Vijay Wadettiwar : 'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
'शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा केविलवाणा प्रयत्न'; लाडकी बहिण योजनेवर विजय वडेट्टीवारांची खरमरीत टीका
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त, 1500 रुपयात काय होणार? रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल  
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget