Friendship Day 2023 : 'अशी ही बनवा बनवी' ते 'दुनियादारी'; आज 'फ्रेंडशिप डे'निमित्त तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत 'हे' सिनेमे नक्का पाहा...
Friendship Day Marathi Movies : मैत्रीचा अर्थ उलगडणारे अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
![Friendship Day 2023 : 'अशी ही बनवा बनवी' ते 'दुनियादारी'; आज 'फ्रेंडशिप डे'निमित्त तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत 'हे' सिनेमे नक्का पाहा... Friendship Day 2023 best Marathi Movies Ashi Hi Banwa Banwi Duniyadari Classmates Friends Dhadakebaaz entertainment latest update Friendship Day 2023 : 'अशी ही बनवा बनवी' ते 'दुनियादारी'; आज 'फ्रेंडशिप डे'निमित्त तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत 'हे' सिनेमे नक्का पाहा...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/06/7afd4abeed2d1bd0a2aba8b8a298bb441691299457958254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathi Movies On Friendship Day 2023 : वयाचं, सीमेचं बंधन नसलेलं नातं म्हणजे मैत्रीचं नातं. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभरात मैत्री दिन (Friendship Day 2023) साजरा केला जातो. आज 'फ्रेंडशिप डे'निमित्त तुम्हाला तुमच्या मित्रमंडळींसोबत घरातच धमाल मस्ती करत छान वेळ घालवायचा असेल तर मैत्रीवर आधारित, मैत्रीचा खरा अर्थ उलगडणारे भन्नाट मराठी सिनेमे तुमच्या लाडक्या मित्र-मंडळींसोबत नक्की पाहा...
1. अशी ही बनवा बनवी (Ashi Hi Banwa Banwi)
फक्त फ्रेंडशिप डेलाच नव्हे तर तुम्ही कधीही कोणत्याही वेळी पाहू शकता असा सिनेमा म्हणजे 'अशी ही बनवा बनवी'. मैत्री आणि प्रेमावर आधारित असलेल्या या सिनेमाची क्रेझ आजही त्यांच्यामध्ये कायम आहे. हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांना पोटभर हसवतो. चार मित्रांच्या मैत्रीची आणि प्रेमाची गोष्ट सांगणारा हा सिनेमा आज नक्की पाहा.
2. दुनियादारी (Duniyadari)
'दुनियादारी' हा सिनेमा 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. संजय जाधव दिग्दर्शित या सिनेमातील गाणी, डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. कॉलेजच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या या सिनेमात अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सुशांत शेलार, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर आणि उर्मिला कानेटकर मुख्य भूमिकेत आहेत.
3. क्लासमेट्स (Classmates)
मैत्रीवर आधारित असलेला 'क्लासमेट' हा सिनेमाही चांगलाच गाजला आहे. या सिनेमातील पात्र तुमच्या आयुष्यातील तुमच्या खऱ्या खुऱ्या मित्रमैत्रिणींशी जुळतील.
मित्र-मैत्रिणींसोबत हा सिनेमा पाहायला तुम्हाला नक्कीच मजा येईल.
4. फ्रेंडस (Friends)
मैत्री कशी असावी हे सांगणारा 'फ्रेंडस' हा सिनेमा आहे. स्वप्नील जोशी आणि सचित पाटील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मैत्री आणि प्रेम जेव्हा निवडावं लागतं तेव्हा मनाची होणारी अस्वस्थता या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
5. धडाकेबाज (Dhadakebaaz)
लक्ष्य, महेश आणि बाप्पा अशा या तीन मित्रांची गोष्ट ‘धडाकेबाज’ या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमातील हे तीनही मित्र गुन्हेगारीसोडून लोकांची मदत करण्याचे ठरवतात. आपल्या जीवाची बाजी लावत हे तिन्ही मित्र शिवापूरला गुन्हेगारी मुक्त करतात. या सिनेमातील कवट्या महाकाल हा खलनायक प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. या सिनेमातील ‘ही दोस्ती तुटायची नाय’ हे गाणं आणि गाण्यातील प्रसंग पाहिल्यावर आजही प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळतात.
संबंधित बातम्या
Friendship Day Songs 2023: दोस्तांच्या आठवणीत रमवतील 'ही' 10 हिट गाणी; पाहा लिस्ट...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)