Sharad Ponkshe : अभिनय, व्याख्याने तर कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' फेम शरद पोंक्षे; जाणून घ्या त्यांचा सिनेप्रवास...
Sharad Ponkshe : अभिनयासह वादग्रस्त वक्तव्यामुळे शरद पोंक्षे अनेकदा चर्चेत असतात.
![Sharad Ponkshe : अभिनय, व्याख्याने तर कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' फेम शरद पोंक्षे; जाणून घ्या त्यांचा सिनेप्रवास... Sharad Ponkshe profile story Me Nathuram Godse Boltoy fame marathi actor Sharad Ponkshe know actor movies drama serials latest update entertainment Sharad Ponkshe : अभिनय, व्याख्याने तर कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे 'मी नथुराम गोडसे बोलतोय' फेम शरद पोंक्षे; जाणून घ्या त्यांचा सिनेप्रवास...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/04/fc87c6be0ac00ed8a0b3cb4bacc4ba691691132098487254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sharad Ponkshe : मराठमोळे अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) अनेकदा आपल्या अभिनयासह वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नाटक, मालिका आणि सिनेमे अशा सर्वच माध्यमांत शरद पोंक्षे काम करत आहेत. त्यांचे अनेक नाटकं आणि मालिका चांगल्याच गाजल्या आहेत. मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही त्यांनी काम केलं आहे.
शरद पोंक्षे यांनी विनोदी, गंभीर, नायक, खलनायक अशा वेगवेगळ्या प्रकराच्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 1988 साली 'दे टाळी' या सिनेमाच्या माध्यमातून शरद पोंक्षे यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पुढे 1989 साली 'वरुन सगळे' या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवलं.
शरद पोंक्षे आणि मी नथुराम गोडसे बोलतोय...
शरद पोंक्षे यांचं 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटकं चांगलच गाजलं. जवळपास 20 वर्ष शरद पोंक्षे यांनी हे नाटक केलं आहे. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचा पहिला प्रयोग 10 जुलै 1998 मध्ये झाला. प्रदीप दळवी लिखित विनय आपटे दिग्दर्शित 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाची निर्मिती माऊली प्रॉडक्शनने केली आहे. 1997 मध्ये हे नाटक रंगभूमीवर आलं. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकात शरद पोंक्षे नथुरामाची भूमिका करायचे. या नाटकाला प्रचंड विरोध झाला. पुढे 817 व्या प्रयोगानंतर हे नाटक बंद करण्यात आलं.
शरद पोंक्षे यांनी कर्करोगावर यशस्वी मात केली आहे. त्यानंतर त्यांनी अभिनयासह व्याख्याने द्यायला सुरुवात केली. 'सावरकर' हा त्यांच्या व्याख्यानांचा विषय आहे. आजही अनेक ठिकाणी ते 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या विषयावर व्याख्याने देतात. शरद पोंक्षे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. अभिनयाच्या जोरावर शरद पोंक्षे आज घराघरांत पोहोचले आहेत.
शरद पोंक्षेची कारकीर्द...
शरद पोंक्षे यांनी मालिका, सिनेमे आणि नाटकांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मी नथुराम गोडसे बोलतोय, त्या तिघांची गोष्ट, हिमालयाची सावली ही त्यांची नाटकं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. अग्निहोत्र, उंच माझा झोका, आभाळमाया, कुंकू, जय मल्हार, दामिनी, वादळवाट, वहिनीसाहेब या मालिकांच्या माध्यमातून ते घराघरांत पोहोचले आहेत. नुकतचं छोट्या पडद्यावरील 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेला त्यांनी रामराम केला आहे.
शरद पोंक्षे यांचा सिनेप्रवास...
शरद पोंक्षे 2012 मध्ये जितेंद्र जोशीच्या 'तुकाराम' या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत दिसले होते. त्यांनी समर्थपणे पेललेली ही भूमिका चांगलीच गाजली. हे राम, 88 अंटोप हिल, आखरी, ख्वाहिश, ब्लॅक फ्राइ डे, ओटी कृष्णामाईची, एक पल प्यार का, गाढवाचं लग्न, तूच खरी घरची लक्ष्मी, गोळाबेरीज, तुकाराम, देख तमाशा देख, संदूक अशा अनेक हिंदी-मराठी सिनेमांत शरद पोंक्षे महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. त्यांच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला आहे.
संबंधित बातम्या
Sharad Ponkshe: 'अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,आर्थिक स्थिती बिकट...'; लेकीचं स्वप्न पूर्ण होताच शरद पोंक्षेंनी शेअर केली पोस्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)