Marathi Films : 'देर आये दुरुस्त आये' म्हणत मराठी सिनेमांनी घातला Box Officer धुमाकूळ
Marathi Films : दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा मराठी सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित झाले आहेत. आज 'झिम्मा' आणि 'अजिंक्य' सिनेमा प्रदर्शित झाला आहे.
Marathi Films : चित्रपटगृहांना प्रदर्शनाचा हिरवा कंदील मिळाला आणि मराठीतील बिग बजेट सिनेमांनी त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या. लॉकडाउनमुळे प्रेक्षकांना सिनेमागृहात जाऊन सिनेमे पाहता येत नव्हते. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. अशातच मराठी सिनेवर्तुळात मात्र सावधगिरीने पाऊले टाकली जात आहेत. तब्बल दीड वर्षांच्या इंटर्व्हलनंतर मराठी सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये दाखल झाला आहे. 'देर आये दुरुस्त आये' म्हणत आज मराठीतील 'झिम्मा' आणि 'अजिंक्य' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
18 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज दोन बिग बजेट मराठी सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. हेमंत ढोमेचं दिग्दर्शन असलेला 'झिम्मा' आणि भूषण प्रधान-प्रार्थना बेहेरे यांची मुख्य भूमिका असलेला 'अजिंक्य' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. कोरोना काळात मनोरंजन सृष्टीचं मोठं नुकसान झालं. पण आता या संकटातून सावरत पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी मराठी सिनेमा सज्ज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हे दोन सिनेमे कितीचा गल्ला जमवणार याकडे अवघ्या सिनेविश्वाचं लक्ष आहे.
आगामी मराठी सिनेमे
'गोदावरी' सिनेमा येत्या 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. जितेंद्र जोशी, नीणा कुलकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोकले या कलाकारांच्या यात मुख्य भूमिका आहेत. 'डार्लिंग' सिनेमा 10 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले आहे. चित्रपटात प्रथमेश परब आणि रितीका श्रोत्रीची जोडी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. 'फ्री हिट दणका' चित्रपट येत्या 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'दे धक्का 2' चित्रपट 1 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले आहे.
झिम्मा
'झिम्मा' चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. या चित्रपटात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, छोटी सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे विविध वयोगटातील अभिनेत्रींनी नटलेला हा चित्रपट आहे. या सर्व अभिनेत्रींसोबत चित्रपटाची शान वाढवायला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकरदेखील दिसत आहे.
अजिंक्य
भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरेचा अजिंक्य सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तरुणाईची नेमकी नस ओळखून ज्वलंत विषयावर भाष्य करणारा 'अजिंक्य' सिनेमा आहे. आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या वेगवान प्रवाहात स्वार असणाऱ्या आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारा नायक आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या वेगवान प्रवाहात स्वार असणाऱ्या आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 'अजिंक्य'च्या संघर्षावर बेतलेला हा सिनेमा आहे.
संबंधित बातम्या
Marathi Films : दीड वर्षांनंतर मराठी सिनेमे पुन्हा Box Officer वर, आज झिम्मा आणि अजिंक्य प्रदर्शित
Bob Biswas Movie Trailer : Abhishek bachchan च्या 'बॉब बिस्वास' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
यंदाचा रविवारी प्रेक्षकांसाठी ठरणार खास, प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकांचे रंगणार एक तासाचे विशेष भाग
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha