एक्स्प्लोर

Man Dhaga Dhaga Jodte Nava : माऊचं कमबॅक! 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेत साकारणार आनंदीची भूमिका; प्रोमो आऊट

Marathi Serial : 'मन धागा धागा जोडते नवा' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Man Dhaga Dhaga Jodte Nava Marathi Serial : छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रसारित होत आहेत. 'मन धागा धागा जोडते नवा' (Man Dhaga Dhaga Jodte Nava) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकाचा प्रोमो आऊट झाला आहे. 

'मुलगी झाली हो', 'रंग माझा वेगळा', 'आई कुठे काय करते' सारख्या वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. आता नुकताच प्रोमो आऊट झालेली 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका घटस्फोट या विषयावर भाष्य करणारी आहे.

माऊचं कमबॅक!

'मुलगी झाली हो' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ती आनंदीची भूमिका साकारणार आहे. 

'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेबद्दल दिव्या म्हणाली...

आनंद देणारी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेत्री दिव्या पुगावकर प्रचंड उत्सुक आहे. या नव्या भूमिकेबद्दल बोलताना दिव्या म्हणाली,"मुलगी झाली हो मालिकेत न बोलता खूप काही व्यक्त करण्याचं आव्हान होतं. या मालिकेत मी बोलणार तर आहे पण मनात खूप साऱ्या भावना साचवून. त्यामुळे आनंदी ही व्यक्तिरेखा एक अभिनेत्री म्हणून जास्त आव्हानात्मक आहे".

दिव्या पुढे म्हणाली,"सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या अभिनेत्याला स्क्रीनवर पाहात आले आहे, त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं हे स्वप्नवत आहे. हा अभिनेता नेमका कोण आहे हे कळेलच. पण या मालिकेच्या रुपात नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आनंदी साकारण्यासाठी सध्या मी माझ्या भाषेवर आणि आवाजावर काम करतेय. माऊ या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम आनंदीलाही मिळेल याची खात्री आहे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेबद्दल सतीश राजवाडे म्हणाले,"मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेचा विषय घटस्फोट असा आहे. घटस्फोट हा कोणत्याही गोष्टीचा शेवट नाही. आयुष्याच्या प्रवासात या एका अपघातानंतर बराच प्रवास असतो जो सुखकर असू शकतो, हे दाखवणारी ही मालिका आहे. प्रत्येक घटस्फोटित मुलासाठी, मुलीसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका एक प्रेरणादायी मालिका असेल याची आम्हाला खात्री आहे". 

'मन धागा धागा जोडते नवा' कधी सुरू होणार? 

'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका प्रेक्षकांना 8 मेपासून सायंकाळी 6.30 वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. लग्न झालं की मुलीचा माहेरशी असलेला संबंध खरंच संपतो..?, असं म्हणत या मालिकेचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. आता या मालिकेत दिव्यासोबत कोण दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 

संबंधित बातम्या

Appi Amchi Collector : उज्वल निकम आणि विश्वास पाटील घेणार अप्पीची मुलाखत; कलेक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Politics : पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bacchu Kadu and Raju Shetti : तिसऱ्या आघाडीत एमआयएमला नो एन्ट्री : बच्चू कडूPrakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगेLaxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आंदोलन बारामतीच्या इशाऱ्यावर, लक्ष्मण हाकेंचा आरोपBabanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Politics : पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
पितृ पंधरवड्यातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, मोदींच्या कार्यक्रमासह अनेक कार्यक्रमांची जंत्री
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Amit Thackeray: मोठी बातमी: अमित ठाकरे भांडुपमधून विधानसभा निवडणूक लढवणार? कोकणी मतदार 'राजा'ला साथ देणार?
मोठी बातमी: अमित ठाकरे भांडुपमधून विधानसभा निवडणूक लढवणार? कोकणी मतदार 'राजा'ला साथ देणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Embed widget