Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Lebanon Pager Serial Blasts : इस्रायली हॅकिंग टाळण्यासाठी लेबनॉनमधील इराण-समर्थित हिजबुल्ला संघटनेचे फायटर्स मोबाइल फोनऐवजी पेजर आणि वॉकी-टॉकी वापरतात.
Lebanon Pager Serial Blasts : लेबनॉनच्या अनेक शहरांमध्ये लोकांच्या खिशात, हातात असलेले पेजरचा अचानक घरे, रस्त्यावर आणि बाजारात स्फोट होऊ लागल्यानंतर हाहाकार उडाला. लेबनॉन ते सीरियापर्यंत सुमारे तासभर स्फोटांचा क्रम सुरू होता. या बॉम्बस्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला असून 3 हजारांहून अधिक लोक जखमी झाले. हिजबुल्लाला लक्ष्य करणारे पेजर बॉम्बस्फोट होते, परंतु यामध्ये नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये इराणच्या राजदूताचाही समावेश आहे. हिजबुल्लाहने बॉम्बस्फोटाचा आरोप इस्रायलवर केला आहे.
पेजर आणि वॉकी-टॉकीनंतर, आता लेबनॉनमध्ये सौर ऊर्जा प्रणालींमध्ये स्फोट होत आहेत. गेल्या दोन दिवसांत तीन प्रकारच्या बॉम्बस्फोटात 32 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. या स्फोटांनंतर लोकांच्या मनात मोबाईलला हात लावण्याची भीती आहे. त्याचवेळी हिजबुल्लाहने आपल्या फायटर्सना त्यांच्या फोनच्या बॅटरी काढून फेकण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बैठक बोलावली
इस्रायली हॅकिंग टाळण्यासाठी लेबनॉनमधील इराण-समर्थित हिजबुल्ला संघटनेचे फायटर्स मोबाइल फोनऐवजी पेजर आणि वॉकी-टॉकी वापरतात. त्याच वेळी, राजधानी बेरूतमध्ये मोठ्या संख्येने घरांवर सौर यंत्रणा बसविण्यात आली आहे. हिजबुल्लाहने या हल्ल्यांचा आरोप इस्रायलवर केला आहे. याप्रकरणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे.
संपूर्ण लेबनॉनमध्ये स्फोटकांची मालिका
पेजर, वॉकी-टॉकी आणि सेलफोनसह वायरलेस कम्युनिकेशन उपकरणांचा संपूर्ण लेबनॉनमध्ये (Explosions Across Lebanon) स्फोट झाले आहेत. यामध्ये 32 लोक ठार झाले असून 3 हजारहून अधिक जखमी झाले आहेत.
इस्रायली गुप्तचर मोसादवर हल्ल्याचा आरोप
इस्रायलने या हल्ल्यातील सहभागाची पुष्टी केलेली नसली तरी, हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ले केल्याचा आरोप केला आहे. इस्रायली लष्कराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कोणती ठिकाणे टार्गेट करण्यात आली?
निवासी इमारती, अंत्यविधी, किराणा दुकाने आणि न्हाव्याची दुकाने यासारख्या विविध नागरी भागात स्फोट झाले.
कायदेशीर उल्लंघन आणि युद्ध गुन्हे (Legal Violations and War Crimes)
इस्त्रायली गुप्तचर संस्था 'मोसाद'वर या हल्ल्याचा आरोप होत आहे. तज्ञ्जांनी अशा प्रकारचे हल्ले आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे (IHL) उल्लंघन करू शकतात, असे म्हटले आहे. विशेषत: हे हल्ले अविवेकी असल्याचे म्हटले आहे. बूबी-ट्रॅप केलेली उपकरणे (booby-trapped devices) अविवेकी मानली जातात. कारण ते विशेषत: लष्करी उद्दिष्टांना लक्ष्य करू शकत नाहीत, परिणामी निष्पाप नागरी मृत्यू होतात. प्रतिबंधित बूबी ट्रॅपवर (Prohibited Booby-Traps) DAWN (Democracy for the Arab World Now) मधील साराह लीह व्हिटसन आणि मानवाधिकार वकील हुवैदा अराफ यांनी दिलेल्या माहितीनुसार 1996 च्या यूएन प्रोटोकॉल ऑन द प्रोहिबिशन किंवा माइन्स, बूबी-ट्रॅप्स आणि इतर उपकरणांच्या वापरावरील निर्बंधांनुसार नागरी वस्तूंना बूबी-ट्रॅपिंग बेकायदेशीर आहे.
नागरी जीवितहानी आणि मानसिक हानी
लेबनाॅनमधील या हल्ल्यांमुळे केवळ शारीरिक हानीच झाली नसून सामान्य नागरी भागात उपकरणे ठेवल्यामुळे नागरिकांवर मानसिक आणि भावनिक आघात झाला आहे. यामधील काही बळी हिजबुल्लाह संबंधित होते, परंतु ते लढाऊ नव्हते, असेही म्हटले जात आहे.
ह्यूमन राइट्स वॉचची टीका
ह्यूमन राइट्स वॉचने (Human Rights Watch’s Criticism) बूबी ट्रॅप्सच्या वापरावर टीका केली आहे. ते बेकायदेशीर आहेत कारण ते लष्करी आणि नागरी लक्ष्यांमध्ये विश्वासार्हपणे फरक करू शकत नसल्याचे म्हटले आहे. ह्युमन राइट्स वॉचने जबाबदारी निश्चित करण्यासाठी घटनांच्या निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे.
युद्ध नियमांचे पालन केलं आहे का?
IHL अंतर्गत, कोणतीही लष्करी कारवाई प्रमाणबद्ध असणे आवश्यक आहे आणि नागरिकांना इजा होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे. स्फोट आणि नागरी जीवितहानी यांचे स्वरूप पाहता इस्रायलने या तत्त्वांचे पालन केले आहे का? असा प्रश्न तज्ञांनी केला आहे. विशेषत: लेबनॉनच्या आरोग्य प्रणाली आणि पायाभूत सुविधा मर्यादित आहेत.
हिजबुल्लाहच्या ऑपरेशन्सवर मर्यादित प्रभाव
दुसरीकडे लेबनॉनमध्ये हल्ल्यानंतर अनागोंदी असूनही, हिजबुल्लाहने इस्त्रायली लष्करी तळांवर हल्ले करणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे या स्फोटांमुळे त्यांच्या ऑपरेशनल क्षमतेत कोणताच अडथळा आला नसल्याचे दिसून आले.
इतर महत्वाच्या बातम्या